कोविड-19 ची (COVID-19) लागण झालेल्या 59 वर्षीय अब्दुल कादिर मोहम्मद फराह (Abdulkadir Mohamed Farah) यांचे लंडनच्या रूग्णालयात निधन झाले. कन्फेडरेशन ऑफ आफ्रिकन फुटबॉल (CAF) आणि सोमाली फुटबॉल फेडरेशनने (SFF) या घटनेची पुष्टी केली. लंडनच्या रूग्णालयात दाखल झालेल्या फराह यांची पॉझिटिव्ह चाचणी आल्यानंतर एका आठवड्यानंतर निधन झाले. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) बरेच शक्तिशाली देश पूर्णपणे विखुरलेले आहेत, हा रोग टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, परंतु या रोगाचा अजूनही शंभर टक्के परिपूर्ण उपचार मिळालेला नसल्याने हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. चीन, इटली, अमेरिका, स्पेन येथून परदेशी आणि स्थानिक प्रवाश्यांनी हळूहळू भारताच्या प्रत्येक राज्यात या आजाराचा प्रसार केला आहे. अशा स्थितीत भारताच्या अनेक राज्यात कर्फ्यू जाहीर करण्यात आले आहेत. आणि आता फुटबॉल विश्वातील 59 वर्षीय दिग्गजांच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Tokyo Olympics 2020: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली)
कोरोना व्हायरसमुळे जीव गमावलेले फराह पहिले आफ्रिकन फुटबॉलर बनले. फराहने आपल्या खेळाच्या कारकीर्दीची सुरुवात 44 वर्षांपूर्वी राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेत प्रथम केली होती. त्यानंतर 1979 सालच्या च्या प्रादेशिक फुटबॉल स्पर्धेत हिरान प्रदेशाचे प्रतिनिधित्व केले. 1980 च्या उत्तरार्धापूर्वीपर्यंत हॉर्न ऑफ आफ्रिका प्रदेशात बटरोलका एफसीबरोबर त्यांनी एक उत्तम कारकीर्द बनविली होती. खेळातून निवृत्ती जाहीर केल्यावर त्यांनी सोमालियामधील युवा आणि क्रीडा मंत्री सल्लागार म्हणून काम केले होते.
कोरोना व्हायरसमुळे जगातील जवळपास प्रत्येक क्रीडा स्पर्धाला स्थगिती देण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिकदेखील एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.चीनच्या वूहानमधून पसरलेल्या या व्हायरसने जगभरात तब्बल 20,000 हुन अधिक लोकांचे प्राण घेतले आहेत. आतापर्यंत जगभरात 4,70,000 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतात 600 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 14 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.