OJ Simpson Passes Away at 76: वादग्रस्त तरीही लोकप्रिय फुटबॉलपटू ओजे सिम्पसन यांचे निधन
OJ Simpson (Photo credit: archived, edited, representative image)

अमेरिकन फुटबॉल आयकॉन ओजे सिम्पसन (OJ Simpson Death) यांचे निधन झाले आहे. ते 76 वर्षांचे होते. ओजे फुटबलॉपटू म्हणून सर्वपरीचित असला तरी त्याची कारकीर्द विविध आरोप, गुन्हे आणि कारावासाची शिक्षा अशा विविध कारणांमुळे जगभरात चर्चित होती. पत्नी आणि तिच्या मित्राची हत्या केल्याप्रकरणी 1994 मध्ये दाखल झालेल्या आरोपांमुळे या फुटबॉलपटूची 1994 मध्ये बरीच झाकोळली होती. ESPN ने फुटबॉल आयकॉनचे बुधवारी निधन झाल्याचे वृत्त दिले आहे. तसेच, त्याच्या कुटुंबीयांनीसुद्धा सोशल मीडियावर त्याच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटद्वारे त्याच्या मृत्यूची पुष्टी केली.

ओरेन्थल जेम्स सिम्पसन यांची X पोस्ट

ओजे सिम्पसन यांचा मुलगा ओरेन्थल जेम्स सिम्पसन याने सोशल मीडियावर एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमचे वडील, ओरेन्थल जेम्स सिम्पसन, कर्करोगाशी लढा देत मरण पावले. ते आपली मुले आणि नातवंडांसोबत राहात होते. आमच्यासाठी हा अत्यंत संक्रमणाचा काळ आहे. त्यामुळे गोपनियता आणि आमच्या अलिप्ततेचा कृपया आदर करा.

वादात अडकेली कारकीर्द

ओसे सम्पसन फुटबॉलपटू म्हणून प्रसिद्ध होताच. पण तो सर्वाधिक चर्चेत आला 1994 मध्ये. त्याची पत्नी निकोल ब्राउन सिम्पसन आणि तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमन यांच्यावर लॉस एंजेलिसमध्ये चाकूने वार केरुन हत्या केलेप्रकरणी तो चर्चेत आला. अर्थात पुढे प्रदीर्घ काळानंतर त्याची हे आरोप आणि या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात त्याची मुक्तता झाली असली तरी, त्याची कारकिर्द झाकोळली गेली ती गेलीच. सेलिब्रेटी म्हणून त्याची जी प्रतिमा होती ती पूर्णपणे डागळली गेली. तरीही त्याने मैदानावर आपली कामगिरी दाखवलीच. त्याची मैदानावरील कारकीर्द नेहमीच कौतुकास्पद राहिली आहे. त्याने त्याच्या उमेदीच्या कारकिर्दीत दिवसात बफेलो बिल्स (1969-1977) आणि सॅन फ्रान्सिस्को 49ers (1978-1979) चे प्रतिनिधित्व केले.

गाजलेली कारकीर्द

बफेलो बिल्स (1969-1977) आणि सॅन फ्रान्सिस्को 49ers (1978-1979) चे प्रतिनिधित्व

1968 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया (USC) साठी Heisman ट्रॉफी जिंकली

Heisman ट्रॉफी हा सन्मान सर्वोत्कृष्ट कॉलेज फुटबॉल खेळाडूला दिला जातो

खेळाडू म्हणून नॅशनल फुटबॉल लीग (NFL) सीनमध्ये प्रचंड मागणी

बफेलो बिल्सने त्याला मसुद्यात प्रथम क्रमांकाची निवड

OJ ने पाच फर्स्ट टीम ऑल-प्रो स्क्वॉड्स आणि सहा प्रो बाउलमध्ये स्थान मिळवले. त्याला 1973 मध्ये लीगमधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर (MVP) म्हणून घोषित करण्यात आले. तो एका मोसमात 2,000 यार्ड धावणारा पहिला खेळाडू ठरला. 14 गेममध्ये असे केल्याने, त्याने प्रति गेम 141.3 यार्ड्सची सरासरी काढली, जो अजूनही सर्वकालीन NFL रेकॉर्ड म्हणून उभा आहे. सिम्पसनला 1985 मध्ये प्रो फुटबॉल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर, समालोचन आणि अभिनयाद्वारे तो प्रसिद्धीच्या झोतात राहिला.