FIFA World Cup 2022: आगमी फुटबॉल विश्वचषक 2022 स्पर्धेचे आयोजन यंदा कतार (Qatar) येथे करण्यात आले आहे. परंतु या फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघ अपात्र ठरला आहे. मात्र भारताच्या क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) या स्पर्धेसाठी खास आमंत्रण देण्यात आले आहे. फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल खाटेर यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे.
फिफा वर्ल्ड कप हा फुटबॉल खेळाडूंसाठी अतिशय लोकप्रिय आहे. त्यातच भारतातील क्रिकेट जगतातील लोकांच्या मनातील प्रेम ही उत्कट असल्याचे खाटेर यांनी म्हटले. त्यापुढे त्यांनी 1983 आणि 2011 रोजी क्रिकेट विश्वचषकावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे असे ही ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना आगामी फुटबॉल विश्वचषकाचे आमंत्रण देत असल्याचे खाटेर यांनी स्पष्ट केले आहे.(हेही वाचा-Pulwama Terror Attack: शहीदांच्या मदतीसाठी 'शिखर धवन'चे फेसबुकवरुन आवाहन (Video)
1983 रोजी भारतीय संघाने माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. तर 2011 रोजी महेंद्र सिंग (MS Dhoni) धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक पदाचा मान पटकावला होता. परंतु अद्याप फिफाच्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाची टॉप 100 मधून निवड करण्यात आली नाही.