Pulwama Terror Attack: शहीदांच्या मदतीसाठी 'शिखर धवन'चे फेसबुकवरुन आवाहन (Video)
Shikhar Dhawan (Photo Credit: Facebook)

Pulwama Terror Attack: 14 फेब्रुवारीला पुलवामा येथील दहशतावादी हल्ल्यानंतर शहीदांच्या मदतीसाठी क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडू पुढे सरसावले आहेत. त्यात आता भारतीय सलामीवीर शिखर धवनही सहभागी झाला आहे. धवनने फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर देशवासियांना देखील शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. विरेंद्र सेहवाग उचलणार शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षण खर्च

पोस्ट केलेल्या व्हिडिओत धवन म्हणतो की, "आपले 40 जवान शहीद झाल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई तर होणार नाही. मात्र मी शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे ठरवले आहे. जितके माझ्याने शक्य असेल तितके मी करेन." (पुलवामा येथील भ्याड हल्ल्याप्रकरणी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक खेळाडूंनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना)

पुढे तो म्हणाला की, "मी तुम्हा सर्वांनाही विनंती करतो की, शक्य तितके साहाय्य शहीदांच्या कुटुंबियांना करा. पुढे येऊन आपल्या बांधवांना मदत करण्याची हीच वेळ आहे. परमेश्वर शहीद जवानांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढे जाण्याची शक्ती देवो. जय हिंद."

गुरुवारी (14 फेब्रुवारी) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज (18/2/2019) सकाळपासूनच सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत 4 जवान शहीद झाले असून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे.