FIFA Awards 2019: लिओनेल मेस्सी सहाव्यांदा बनला फिफा फुटबॉलर ऑफ द इयर, जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता पुरस्कार
लिओनेल मेस्सी (Photo Credit: Twitter)

अर्जेंटिना आणि बार्सिलोनाच्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने त्याच्या कट्टर प्रतिस्पर्धी पोर्तुगाल आणि जुव्हेंटसच्या क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याला नमवून फिफा (FIFA) च्या सर्वोत्कृष्ट फुटबॉलर ऑफ द इयरचा (Footballer Of The Year) पुरस्कार रेकॉर्ड सहाव्यांदा जिंकला. पुरस्काराच्या  शर्यतीत या दोघांव्यतिरिक्त नेदरलँड्स आणि लिवरपूल फुटबॉलर व्हर्जिन व्हॅन डायक (Virgil van Dijk) देखील होता. मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012 आणि 2015 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. तर, मागील वर्षी क्रोएशियाच्या लुका मोडेरिच याने हा पुरस्कार जिंकला आणि गेले अनेक वर्षांपासून चाललेले मेस्सी आणि रोनाल्डोचे वर्चस्व मोडून काढले. मागील हंगामात लिव्हरपूलला चॅम्पियन्स लीगमधील कामगिरीबद्दल गेल्या महिन्यात यूईएफएच्या खेळाडूचा पुरस्कार जिंकणार्‍या व्हर्जिन व्हॅनला मागे टाकत मेस्सीचा हा विजय सर्वांना आश्चर्यचकित करणारा ठरला. (क्रिस्टियानो रोनाल्डो चा मोठा खुलासा; फुटबॉल मैदानावर गोल करण्यापेक्षा गर्लफ्रेंड जॉर्जीना रोड्रिग्ज सोबत Sex करणे जास्त पसंत)

दुसरीकडे, महिला खेळाडूंमध्ये मेघन रॅपिनो (Megan Rapinoe) हिने पहिल्यांदा फिफा 'वुमन ऑफ द इयर' चा पुरस्कार जिंकला. इटलीच्या मिलान येथे झालेल्या कार्यक्रमात अमेरिका संघाचे प्रशिक्षक जिल एलिस यांना 'सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, लिवरपूल क्लबचे मॅनेजर जर्गन क्लोप यांना फुटबॉल जगातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा पुरस्कार देण्यात आला. मागील वर्षी त्यांनी या संघाला प्रशिक्षण देऊन चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले होते. लिव्हरपूलच्या एलिसन बेकर याला सर्वोत्कृष्ट पुरुष गोलकीपरसाठीचा पुरस्कार मिळाला.

फिफाच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कार सोहळ्यातील सर्व विजेत्यांची यादी: 

सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू: लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना/बार्सिलोना)

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूः मेगन रॅपिनो (यूएसए/रिजन एफसी)

सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक: अ‍ॅलिसन बेकर (ब्राझील/लिवरपूल)

सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपर: साडी व्हॅन व्हेनेंदाल (नेदरलँड/एटलेटिको मैड्रिड)

पुरुषांचा वर्ल्ड 11 वर्षाचा संघः अ‍ॅलिसन बेकर, सर्जिओ रामोस, व्हर्जिन व्हॅन डिजक, मॅथिज डी लिग्ट, मार्सेलो, लुका मॉड्रिक, फ्रेन्की डी जोंग, इडन हजार्ड, लिओनेल मेस्सी, कीलियन एम्बाप्पे, आणि क्रिस्टियानो रोनाल्डो.

महिला वर्ल्ड 11 संघ: साड़ी वान वेनेंदल, लुसी ब्रॉन्ज, वेंडी रेनार्ड, निला फिशर, केली ओ'हारा, अमैंडा हेनरी, जूली एर्त्ज़, रोज लावेले, मार्ता, एलेक्स मॉर्गन आणि मेगन रेपिनो.

पुरुष प्रशिक्षक: जर्गन क्लोप (लिव्हरपूल)

महिला प्रशिक्षक: जिल एलिस (यूएसए)

पुस्कास अवॉर्ड सर्वोत्कृष्ट गोलः डॅनियल झेझोरी

फेअर-प्ले पुरस्कारः मार्सेलो बिल्सा आणि लीड्स युनायटेड