EURO 2020 Final: इंग्लंड संघाला 3-2 फरकाने पराभूत करत यूरो चषक 2020 वर इटलीने कोरले नाव
Team Italy (Photo Credits: Twitter)

तब्बल 55 वर्षांची खंत भरुन काढत युरो कप 2020 (EURO 2020) वर आपले नाव केरण्याचे इंग्लंडचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. यूरो कप फायनलमध्ये इटलीने बाजी मारत युरो कप 2021 आपल्या खिशात घातला. इटलीने पेनेल्टी शूटआउटमध्ये 3-2 ने इंग्लांडला पराभूत करत या चषकावर आपले नाव कोरले. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर (Wembley Stadium in London) हा थरार रंगला. इंग्लंडच्या फूटबॉल संघाने रविवारी यूरो चषक 2020 अंतिम सामन्यात (EURO 2020 Final) पाठिमागील 33 सामन्यांपासून अजिंक्य राहिलेल्या इटली विरुद्ध (England Vs Italy) आपल्या घरच्या मैदानावर लढत दिली. या लढतीत पाठिमागील 55 वर्षांचा इतिहास पूसन पुन्हा एकदा या चषकावर नाव करोण्याचे इंग्लंडचे स्वप्न होते. परंतू, घरच्याच मैदानावर इंग्लंडचे हे स्वप्न धुळीस मिळाले.

यूरो चषक 1966 मध्ये इंग्लंड विश्वविजेता ठरला होता. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला एकदाही या चषकावर नाव कोरता आले आहे. इतकेच नव्हे तर इंग्लंडला फायनलपर्यंतही फार वेळा मजल मारता आली नाही. दरम्यान इटलीचा यूरो चषक स्पर्धेतील हा 34 वा विजय आहे. इटलीने या आधी 2006 मध्ये शेवटचे यूरो चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर आता 2020 मध्ये इटलीने पुन्हा एकदा हा चषक जिंकला आहे.

इटलीच्या इनुभवी डिफेंडर जियोर्जियो चिलिनी याने सामन्यापूर्वीच म्हटले होते की, देशासाठी हा चषक जिंकण्याचा दबाव हा आमच्या संघातील खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहे. हा माच्या करीअरमधील अंतिम सामना आहे जो अधिक प्रेरणादायी आहे. त्याने म्हटले होते पाठिमागील 36 वर्षांच्या काळापैकी हा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की, हे काम किती कठीण आणि मेहनत करणारे असते. (हेही वाचा,EURO 2020 Final Live Streaming: भारतात कुठे आणि किती वाजता बघाल England vs Italy यूरो कप फायनल लाइव्ह आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग? जाणून घ्या सर्व डिटेल्स )

ट्विट

यूरो कप 2020 स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की, या स्पर्धेत इटलीने एकही सामना गमावला नाही. प्रत्येक सामन्यात विजयी घोडदौड करत इटलीने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. साखळी फेरीत इटलीने टर्की, स्वित्झर्लंड, वेल्सला ऑस्ट्रिया आदी संघांचा पराभव केला. पुढे उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमला 2-1 च्या फरकाने पराभूत करत पुढच्या फेरीत धडक मारली. उपान्त्य फेरीत पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीने स्पेनचा 4-2 अशा फरकाने पराभव केला.