Cristiano Ronaldo Joins Man United: जगातील महान फुटबॉलपटूंपैकी पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) युव्हेंटस (Juventus) क्लबची साथ सोडली आहे आणि तो तो मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लबमध्ये सामील झाला आहे. 36 वर्षीय रोनाल्डोने आज युव्हेंटस क्लबचे लॉकर रिकामे केले आणि मैदानावर अंतिम वेळी सहकारी खेळाडूंसोबत सराव केला. इंग्लंडच्या मोठ्या क्लबपैकी एक असलेल्या मँचेस्टर युनायटेडने एक निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे. रोनाल्डो 2018 मध्ये इटालियन क्लब जुव्हेंटसमध्ये सामील झाला होता. त्याने या क्लबसाठी 98 सामन्यांत 81 गोल केले आहेत. तसेच क्रिस्टियानो रोनाल्डोची ही मँचेस्टर युनायटेडसह दुसरी इंनिंग आहे. क्लबने एका निवेदनात म्हटले, “मँचेस्टर युनायटेडने क्रिस्टियानो रोनाल्डोच्या ट्रांसफरसाठी जुव्हेंटसशी करार केला आहे. वैयक्तिक मुदत, व्हिसा आणि वैद्यकीय कराराच्या अधीन आहे.”
दरम्यान, इटालियन प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, रोनाल्डोला मँचेस्टर युनायटेडने 25 लाख युरो म्हणजेच 216 कोटींपेक्षा जास्त रकमेवर खरेदी केले आहे. तथापि, कराराचे आर्थिक तपशील अद्याप जाहीरपणे जाहीर केले गेले नाहीत. यापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये अशी अटकळ होती की रोनाल्डोची मँचेस्टर सिटीसाठी (Manchester City) निवड होऊ शकते. तथापि, नंतर असे सांगण्यात आले की 36 वर्षीय युनायटेडमध्ये परत येण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी सिटीने चर्चेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 13 वर्षांपूर्वी तो यूनाइटेड संघासाठी खेळला होता. रोनाल्डोने ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे सहा यशस्वी वर्षे व्यतीत केली, जिथे त्याने 2009 मध्ये रियल माद्रिदला जाण्यापूर्वी क्लबच्या महान खेळाडूंपैकी एक म्हणून आपली प्रतिष्ठा निर्माण केली. रोनाल्डो युनायटेडकडून 2003-09 दरम्यान खेळला आणि तत्कालीन व्यवस्थापक अॅलेक्स फर्ग्युसनच्या मार्गदर्शनाखाली सुपरस्टार बनला. रोनाल्डो तीन वर्षांनंतर युव्हेंटसची साथ सोडली जिथे तो रियल माद्रिद क्लबमधून सामील झाला होता.
Welcome 𝗵𝗼𝗺𝗲, @Cristiano 🔴#MUFC | #Ronaldo
— Manchester United (@ManUtd) August 27, 2021
पाच वेळा Ballon d’Or विजेता रोनाल्डोने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत 30 पेक्षा जास्त प्रमुख ट्रॉफी जिंकल्या आहेत. यामध्ये पाच यूईएफए चॅम्पियन्स लीग जेतेपदे, चार फिफा क्लब विश्वचषक, इंग्लंड, स्पेन आणि इटलीमधील सात लीग जेतेपद आणि त्याच्या मूळ पोर्तुगालसाठी युरोपियन चॅम्पियनशिपचा समावेश आहे. 2003-2009 दरम्यान युनायटेडसाठी त्याच्या मागील कार्यकाळात रोनाल्डोने त्याच्या 292 सामन्यांमध्ये 118 गोल केले. त्याने 2008 मध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आठ प्रमुख ट्रॉफी आणि Ballon d’Or जिंकले.