फिफा वर्ल्ड कप कतर 2022 (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) क्रीडा विश्वातही आपले पाय पसरवले आहे. फुटबॉल क्षेत्रातून वाईट बातमी समोर आली आहे की कतार फिफा वर्ल्ड कपचे (Qatar FIFA World Cup) ब्रँड अँम्बेसेडर 54 वर्षीय आदिल खामीस (Adel Khamis) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. गुरुवारी आयोजन समितीने याची पुष्टी केली. यापूर्वीही वर्ल्ड कपच्या तयारीत सामील झालेल्या 3 स्टेडियममधील 8 कर्मचारी संक्रमित असल्याचे समोर आले होते. 2022 च्या स्पर्धेच्या संघटनेच्या सुप्रीम कमिटीने ट्विटमध्ये म्हटले, "कतारचे निवृत्त मिडफिल्डर आदेल खामिस (54) यांना कोविड-19, कोरोना व्हायरसचे दुर्दैवाने निदान झाले." "आम्ही बाधित झालेल्या सर्वांसाठी त्वरित पुनर्प्राप्तीची इच्छा करतो." 2022 सुविधांच्या बांधकामात गुंतलेल्यांमध्ये तीन स्टेडियममधील आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, परंतु आयोजकांनी 17 एप्रिलपासून अद्ययावत यावर कोणतीही माहिती दिलेली नाही. (Coronavirus: जपानचे प्रधानमंत्री शिंजो अबे यांनी ऑलिम्पिकवर केले मोठे विधान, कोरोना व्हायरसवर मात केल्याशिवाय टोकियो खेळाचे आयोजन कठीण)

जगभर पसरलेल्या या व्हायरसच्या संकटकाळी फिफा वर्ल्ड कपसाठी सर्व तयारी चालू आहे. कतारच्या वर्ल्ड कप स्टेडियमवर आणि स्पर्धेशी जोडल्या गेलेल्या मेगा-प्रोजेक्ट्सचे काम कठोर सामाजिक अंतर नियमांनंतरही वेगाने सुरु आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर 2022 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आदिल कतारच्या राष्ट्रीय संघात खेळला आहे. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने कतार संघाकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांनी आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात 1983 मध्ये केली आणि 2000 मध्ये ते निवृत्त झाले. त्यांनी सुदान विरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

दुसरीकडे, कतारमध्ये कोविड-19 ची 13,409 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 1,372 जण बरे झाले आहेत आणि 10 मृत्यूची नोंद झाली आहे. दुसरीकडे, जगभरात 32 लाख हुन अधिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी 2.23 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे आजवर बर्‍याच क्रीडा दिग्गजांना प्राण गमवावे लागले आहे.