प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

हॉकी इंडियाने (Hockey India) आपल्या खेळाडूंना कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाउननंतर पुन्हा एकदा स्पोर्टिंग कार्यक्रम सुरू झाल्यावर स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरल्यास त्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप (Aarogya Setu App) डाऊनलोड करण्याचे आदेश संघटनेने दिले आहेत. बुधवारी राज्य एककांना दिलेल्या 20 पानांच्या डॉसियरमध्ये हॉकी इंडियाने सांगितले की ते अ‍ॅपद्वारे खेळाडूंच्या आरोग्यावर नजर ठेवेल आणि केवळ ‘सुरक्षित’ किंवा ‘कमी धोका’ असणार्‍या खेळाडूंनाच यात सहभागी होण्यास अनुमती दिली जाईल. जगभरासह भारतात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. भारत लॉकलाउन काळात केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अ‍ॅपबद्दल अनेक चर्चा झाल्या. देशभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची नेमकी माहिती, रेड-ग्रीन-ऑरेंज झोन कुठे आहेत, रुग्णांची संख्या, उपचार केंद्र याविषयीची सर्व माहिती या अ‍ॅपमध्ये आहे.अनेकांना केंद्र सरकारने हे अ‍ॅप डाउनलोड करण्याचे सक्तीचे केले आहे. (कोरोना व्हायरसचं संकट: फिफा अंडर-17 महिला वर्ल्ड कप 2021 पर्यंत स्थगित, 17 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान भारतात होणार आयोजन)

हॉकी इंडियाच्या कर्मचार्‍यांना अ‍ॅप देखील वापरावा लागेल जो सरकारचा कोविड-19 ट्रॅकर आहे. हॉकी इंडिया आरोग्य सेतू मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व खेळाडू आणि कर्मचा्यांना आगामी स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी आरोग्य सेतुवर स्टेटस दाखवावे लागणार. एखादा खेळाडू ‘मॉडरेट’ किंवा ‘हाय रिस्क’ वर असेल तर त्याने प्रवास करण्याची गरज नसल्याचंही हॉकी इंडियाने आपल्या नियमावलीमध्ये म्हटलंय. गुरुवारी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांची हॉकी इंडियाचे अधिकारी आणि काही खेळाडूंसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे. बंगळुरु येथील साई केंद्रात असलेला महिला आणि पुरुष संघ घराबाहेर प्रशिक्षणासाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

दुसरीकडे, अ‍ॅपमधील डेटा हॅकर्सच्या हाती सहज लागेल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती, मात्र केंद्राने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.