Pooja Sihag Husband Dies: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील कांस्यपदक विजेती पूजा सिहाग (Pooja Sihag) चा पती अजय नंदल (Ajay Nandal) याचा शनिवारी रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. नंदलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवालाची प्रतीक्षा आहे. मात्र, मृताच्या वडिलांनी नंदलचा मित्र रवी याच्यावर ड्रग ओव्हरडोज केल्याचा आरोप केला. ही घटना सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. रोहतकचे डीएसपी महेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना महाराणी किशोरी जाट कन्या महाविद्यालयाजवळ घडली.
नंदल हा हरियाणातील रोहतकमधील गार्ही बोहर गावचा रहिवासी होता. तो एख कुस्तीपटू आणि लष्करी अधिकारीही होता. वृत्तानुसार, रवी आणि आणखी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. (हेही वाचा - Virat kohli On Babar Azam: बाबर आझमसोबतच्या पहिल्या भेटीबाबत विराट कोहलीने केला खुलासा, सांगितले यावेळी जगातील सर्वोत्तम फलंदाज)
Haryana| CWG bronze medalist Pooja Sihag’s husband declared dead in Rohtak
Ajay Nandal's body sent for post-mortem. His father has alleged a drug overdose involving Ajay's friend Ravi. The incident took place near Maharani Kishori Jat Kanya Mahavidyalaya: Rohtak DSP Mahesh Kumar pic.twitter.com/KEVFMBpv6c
— ANI (@ANI) August 27, 2022
अजय नंदलच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.पूजाने नुकत्याच संपलेल्या खेळांमध्ये महिलांच्या फ्रीस्टाइल 76 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते. तिने ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुइनचा पराभव केला होता. पूजाने न्यूझीलंडच्या मिशेल माँटेगचा पराभव करत आपली सलामीची लढत जिंकली. मात्र, उपांत्य फेरीत तिला कॅनडाच्या जस्टिना डी स्टॅसिओकडून पराभव पत्करावा लागला.