Brazil vs South Korea (Photo Credits: Getty Images)

ब्राझील (Brazil) आणि दक्षिण कोरिया (South Korea) संघात आज फ्रेंडली मॅच सौदी अरेबियामध्ये खेळली जाईल. कोपा अमेरिका विजेत्यांचा शुक्रवारी अर्जेंटिनाकडून 1-0 असा पराभव झाला, तर विश्वचषक पात्रता स्पर्धेत दक्षिण कोरियाने गुरुवारी लेबनॉनविरुद्ध 0-0 ने सामना ड्रॉ केला. पुढच्या महिन्यात ईएएफएफ पूर्व आशियाई चषक सुरू होण्यापूर्वी आशियाई देश हा सामना अंतिम फ्रेंडली सामना म्हणून पाहत आहे. चाहत्यांनी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात रस गमावल्याच्या बातम्या समोर येत आहेत. फुटबॉलच्या देशासाठी श्वास आहे, अशा देशासाठी याची कल्पनाही करणे अशक्य आहे. ब्राझीलसाठी दक्षिण कोरियाविरुद्ध सामना कठीण असणार आहे. दक्षिण कोरियासारख्या मजबूत संघाला पराभूत करणासाठी ब्राझीलला चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. दरम्यान, दूरदर्शन वाहिन्यांवरील थेट प्रक्षेपण शोधणार्‍या ब्राझील नॅशनल फुटबॉल टीमच्या चाहत्यांना आणि आयएसटीमधील सामन्यांच्या वेळेसह ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया आंतरराष्ट्रीय मैत्री 2019 चे ऑनलाईन विनामूल्य प्रक्षेपणा संबंधित सर्व माहिती खाली मिळेल.

ब्राझीलसाठी नेमारची (Neymar) अनुपस्थिती चिंताजनक आहे. त्यांच्या मुख्य खेळाडू विना ब्राझीलचा संघ कमकुवत दिसत आहे. खेळपट्टीवर त्याची उपस्थिती मॅचला मनोरंजक करते, शिवाय खेळाडूंमध्येही नवीन ऊर्जा भरते. दक्षिण कोरियाने 2022 च्या विश्वकरंडक पात्रतेच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले असून ब्राझीलला पराभूत करणे त्यांच्या मनोवृत्तीसाठीच नव्हे तर संपूर्ण संघाच्या नेहमी संस्मरणात राहण्यासारखे असेल. ब्राझीलच्या खेळाडूंनी त्यांच्या सामर्थ्यावर खेळण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि निकालाबद्दल जास्त विचार न करणे महत्वाचे आहे.  दोन्ही संघात आजवर 5 सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी 4 मॅचमध्ये ब्राझील, तर 1 मध्ये दक्षिण कोरियाने विजय मिळवला आहे. दोन्ही संघातील अखेरचा सामना 2013 मध्ये सोलमध्ये झाला होता. यात नेमार आणि ऑस्करच्या गोलमुळे ब्राझीलने 2-0 ने सामना जिंकला होता.

भारतातील या दोन्ही संघाच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आणि वाईट बातमी आहे. ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया सामन्याचे अधिकृत ब्रॉडकास्टर भारतात नसल्याने या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात दिसणार नाही, परंतु अद्याप जीएचडी स्पोर्ट्स अँप आणि फॅनकोडद्वारे ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया आंतरराष्ट्रीय फ्रेंडली 2019 चं थेट प्रेक्षेपण पाहता येईल.