ब्राझील पुरुष आणि महिला फुटबॉल संघ (Photo Credit: Facebook)

ब्राझिलियन फुटबॉल (Brazil Football) फेडरेशन आता त्यांच्या महिला संघाला पुरुष संघा इतकाच पगार देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. फेडरेशनचे अध्यक्ष रोजारियो काबोकलो (Rogerio Caboclo) म्हणाले की बक्षिसाची रक्कम, भत्ते समान आहेत, आता महिला पुरुषांच्या संघाइतकीच कमाई करतील, म्हणजे सुपरस्टार नेमार आणि अज्ञात महिला संघातील खेळाडूंमध्ये कोणताही फरक होणार नाही. ऑस्ट्रेलिया, नॉर्वे आणि न्यूझीलंड असे काही देश आहेत जेथे असे निर्णय यापूर्वी घेण्यात आले आहेत. पुरुष आणि महिला व्यावसायिक फुटबॉलमध्ये (Women's Football) वेतनाचा विषय गेल्या वर्षी अमेरिकेच्या महिला संघाने (US Women's Football Team) नियामक मंडळाच्या यू एस सॉकरवर कमाई आणि कामकाजाच्या परिस्थितीत लैंगिक भेदभावाचा आरोप लावल्यामुळे चर्चेत आहे. गतविजेत्या जागतिक चॅम्पियन अमेरिकन संघाने मार्च 2019 मध्ये फेडरेशनविरूद्ध भेदभावाचा खटला दाखल केला होता. यंदा मे महिन्यात न्यायाधीशांनी त्यांचा खटला फेटाळून लावला, परंतु संघाने पुन्हा अपील केले.

"यापुढे लिंगभेदामध्ये फरक नाही, सीबीएफ पुरुष आणि स्त्रियांशी समान वागणूक देत आहे," ब्राझिलियन फुटबॉल परिसंघाचे प्रमुख कॅबोक्लो यांनी एका निवेदनात म्हटले. ब्राझीलच्या फुटबॉलर फेडरेशनने सांगितले हा निर्णय त्यांनी महिला संघ आणि त्यांचे स्वीडिश प्रशिक्षक पिया सुंधगे यांना मार्चमध्ये कळवला होता. पुढील वर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या टीमसह पुरुष आणि महिला वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये हा निर्णय लागू केला जाईल. पुरुष संघ फुटबॉलमध्ये सर्वाधिक यशस्वी झाला असून त्यांनी पाच वेळा वर्ल्ड कपचे जेतेपद जिंकले आहेत. दरम्यान, ब्राझील महिला संघाने 2007 वर्ल्ड कप फायनल तर 2004 आणि 2008 मध्ये ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश करत बळकट कामगिरी बजावली आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन फुटबॉल नियामक मंडळाने नोव्हेंबरमध्ये म्हटले की पुरुष व महिला संघांमधील वेतन अंतर कमी करणारे नवीन सामूहिक सौदेबाजी करारावर त्यांनी खेळाडू संघटनेशी करार केला आहे. न्यूझीलंड आणि नॉर्वे यांनीही पुरुष व महिला खेळाडूंमधील पे गॅपची दखल घेतली आहे.