Rahul Dravid (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफ (वरिष्ठ पुरुष) यांच्या कराराच्या विस्ताराची अधिकृत घोषणा केली आहे. हा निर्णय बोर्ड आणि द्रविड यांच्यातील चर्चेनंतर घेण्यात आला आहे. ज्यांचा कार्यकाळ ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 नंतर संपला होता. मात्र, नव्या करारानुसार त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला. मात्र, असे असले तरी एकूण विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दमदार खेळी केली आहे. त्यामुळे सहाजिकच राहुल आणि त्यांचा एकूण संघ कौतुकास पात्र ठरला. त्यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाला आकार देण्यासाठी निभावलेली महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून ही मुदतवाढ दिल्याची चर्चा आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष, रॉजर बिन्नी यांनी, राहुल द्रविडच्या यांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नांची प्रशंसा केली. द्रविडच्या नेतृत्वाखाली नियामक मंडळ टीम इंडियाच्या सतत यशाची अपेक्षा करते. जे ते पूर्ण करतात. टीम इंडियाच्या यशातही त्यांची महत्त्वपूर्ण राहिली असल्याचे कौतुकोद्गार बिन्नी यांनी काढले.

बीसीसीआयचे मानद सचिव, जय शाह यांनी द्रविडवरील विश्वासाचा पुनरुच्चार करत प्रशिक्षक म्हणून द्रविड यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीवर जोर दिला. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने क्रिकेट विश्वात भक्कम स्थान निर्माण केले आहे. विश्वचषकातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुकचव्हायला हवे, असेही ते म्हणाले.

ट्विट

राहुल द्रविडने यांनी मिळालेल्या मुदतवाढीबद्दल बोलताना सांगितले की, संघातील लवचिकता आणि सौहार्द यावर भर देत, गेल्या दोन वर्षांतील संघाच्या प्रवासाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच, बीसीसीआय आणि त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास आणि पाठिंबा याबद्दल आभार मानले. द्रविडने विश्वचषकानंतर नवीन आव्हानांसाठी तयारी करत असताना उत्कृष्टतेसाठी संघ कठीबद्ध राहिल, असेही त्यांनी सांगितले.