Basketball Star Kobe Bryant | (Photo Credits-ANI)

अमेरिकेचा जगप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू (Basketball Star) कोबी ब्रायंट (Kobe Bryant) यांचा हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) मृत्यू झाला आहे. कैलीफोर्निया येथे ही घटना घडली. या अपघातात कोबी ब्रायंट यांच्यासह इतर 9 लोकांचाही मृत्यू झाला. यात ब्रायंट याची 13 वर्षी मुलगी गियाना (Gianna ) मारिया हिचाही समावेश आहे. हे सर्वजण एका खासगी हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. हे हेलिकॉप्टर कैलाबैसस (Calabasas) शहरावरुन निघाले असता त्याला अचानक आग लागली आणि हा अपघात घडला.

प्राप्त माहितीनुसार, कोबी ब्रायंट यांच्या हेलिकॉप्टरला लॉस एंजिलिस या शहरापासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर अपघात झाला. सांगितले जात आहे की, हेलिकॉप्टरला हवेत असतानाच आग लागली. ज्यामुळे जमीनीपासून काही किलोमीटर उंचीवर असलेले हे हेलिकॉप्टर गिरक्या घेत खाली आले आणि घनदाट झाडीत जमीनवर आदळले. हेलिकॉप्टर जमीनिवर आदळताच एक मोठा स्फोट झाला. यात या हेलिकॉप्टरमधील 9 जण ठार झाले.

डोनाल्ड ट्रम्प ट्विट

दरम्यान, 41 वर्षीय कोबी हा एक प्रतिष्ठित बास्केटबॉलपटू होते. तो नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) मध्ये सुमारे 20 वर्षे खेळले. या काळात त्याने 5 वेळा चॅम्पीयनशीप आपल्या नावे केली. एप्रिल 2016 मध्ये त्याने एनबीएमधून संन्यास घेतला होता. ब्रयंट याची कामगिरी पाहता 2008 एनबीए मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर आणि दोन वेळा एनबीए एमव्हीपी अशी त्यांची कामगिरी आहे. तो दोन वेळा एनबीए आणि स्कोरिंग चॅम्पीयन आणि दोन वेळा ओलिंपीक चॅम्पीयनही राहिले आहेत. त्याने 2018 मध्ये बास्केटबॉल वर बनलेल्या एनिमेटेउ या चित्रपटाच काम केले होते. ज्याला ऑस्कर नामांकनही मिळाले होते. (हेही वाचा, भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत निधन, टेस्टमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याच्या विश्वविक्रमाची केली आहे नोंद)

एएनआय ट्विट

कोबी ब्रायंट यांच्या निधनाचे वृत्त समजताच जगभरातून त्याच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे. न्यू ऑरलियन्स पेलिकन आणि बोस्टन सेल्टिक्स येथे सुरु असलेल्या सामन्यादरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कोबे ब्रायंट याच्या सन्मानार्थ 24 सेंकंदाच्या शॉट-क्लॉक उल्लंघनासह सामना सुरु केला. अनेक बास्केटबॉल खेळाडूंनी कोबी ब्रायंट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, आम्ही ब्रायंट कुटुंबीयांच्या दुख:त सहभाही असल्याचेही म्हटले आहे.