माजी भारतीय क्रिकेटपटू आणि धाकड अष्टपैलू बापू नाडकर्णी (Bapu Nadkarni) यांचे शुक्रवारी 17 जानेवारी रोजी निधन झाले. बापू नाडकर्णी यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. या भारतीय खेळाडूच्या नावर सर्वाधिक मेडन ओव्हर फेकल्या गेलेल्याच्या विश्वविक्रमाची नोंद आहे, जो अजूनही अतूट आहे. याशिवाय, डावखुरा गोलंदाज बापू नाडकर्णी यांनी इंग्लंडच्या संघाविरूद्ध एकही धावा न देता सलग 21 ओव्हरची गोलंदाजी केली, हा आजवरचा अखंड विश्वविक्रम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने त्यांचा हा विक्रम मोडला नाही. बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी आपल्या कुटुंबासमवेत मुंबईत राहत होते. 4 एप्रिल 1993 रोजी जन्मलेल्या बापू नाडकर्णी यांनी तब्बल 13 वर्षे भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळला आहे, ज्यात त्यांनी या उत्कृष्ट विक्रमांची नोंद केली आहे. बापूंच्या निधनाने एक ज्येष्ठ आणि क्रिकेट विश्वातील जाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेला आहे.
12 जानेवारी 1964 रोजी बापू नाडकर्णीने सतत 21 ओव्हर फेकले. इंग्लंडविरुद्ध त्या सामन्यात नाडकर्णींनी एकही धावा न देता सलग 131 चेंडू फेकले. हा सामना मद्रास (आताचे चेन्नई) येथे खेळला गेला, त्या सामन्यात भारताने पहिल्या डावात 7 457 धावा केल्या. त्या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावादरम्यान तिन्ही एकूण 29 ओव्हर फेकले, त्यामध्ये 26 मेडन होते. या दरम्यान त्यांनी एकूण 3 धावा दिल्या. मात्र, त्यांना कोणतीही विकेट मिळाली नाही.
One of the most parsimonious bowlers this country has produced! Thank you for the memories, Bapu Nadkarni sir! Om Shanti! pic.twitter.com/F0aBVGcVhs
— Nishad Pai Vaidya (@NishadPaiVaidya) January 17, 2020
याशिवाय, बापू 1955 ते 1968 दरम्यान भारतीय कसोटी संघात खेळले. त्यांनी 1951-52 मध्ये महाराष्ट्राच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दोन वर्षांनंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर तेव्हाच्या बॉम्बेविरुद्ध त्यांनी आपले पहिले शतक झळकावले. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले. 1955-56 मध्ये फिरोजशहा कोटला मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बापूंनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वीनू मंकड यांच्या जागी बापूंना संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी 1968 पर्यंत टीम इंडियाकडून 41 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 65 डावात 88 विकेट्स घेतल्या.