Novak Djokovic Saga: नोवाक जोकोविच याला ऑस्ट्रेलियात 'नो एन्ट्री'; AUS ओपनमध्ये खेळण्याची संधीही गमावली, बेजबाबदारपणा भोवला
Novak Djokovic | (Photo Credit: Twitter/ANI)

अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेला जगातील क्रमांक एकचा टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) ऑस्ट्रेलिया न्यायालयात खटला हारला आहे. व्हिसा रद्द झालेप्रकरणी हा खटला ऑस्ट्रेलिया (Australia) न्यायालयात सुरु होता. खटला हारल्याने जोकोविच याला ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) टुर्नामेंटमध्ये भाग घेता येणार नाही. याशिवाय त्याला ऑस्ट्रेलियातून परतही पाठवले जाणार आहे. इतकेच नव्हे तर फेडरल कोर्टाने त्याच्यावर पुढील तीन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियात ( No Entry To Novak Djokovic in Australia) येण्यावर बंदीही घातली आहे. कोर्टाने नोवाक जोकोविच याची याचिका व्हिडिसा मागण्यासंदर्भातील याचिकाही फेटाळून लावली आहे. या सर्व घडामोडींमुळे नोवाकला चांगलाच धक्का बसला आहे. या खटल्याकडे जगभरातील क्रीडा विश्वाचे लक्ष लागून राहिले होते.

नोवाक जोकोविच याच्या एकूणच प्रकरणावर ऑस्ट्रेलिया सरकार गंभीर होते. ऑस्ट्रेलिया सरकारने म्हटले आहे की, जोकोविच हा सार्वजनिक धोका प्रकारात मोडतो. ऑस्ट्रेलिया ओपन टूर्नामेंटमध्ये येण्यापूर्वी तो कोरोना व्हायरस संक्रमित आढळला होता. त्यानंतर त्याने पाठिमागील महिन्यात आपला देश सर्बिया येथेही काही कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. जोकोविच याने स्वत:ही मान्य केले होते की, कोरोना व्हायरस संक्रमित असतानाही त्याने एका पत्रकाराला मुलाखत दिली होती. याशिवाय ऑस्ट्रेलियात प्रवेश करताना त्याने अनेक नियमांचा भंग केला तसेच इमिग्रेशन फॉर्म भरताना चुकाही केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या जोकोविच याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. (हेही वाचा, Novak Djokovic Australia Visa Row: सर्बियन टेनिसस्टार नोवाक जोकोविचचा ऑस्ट्रेलियन व्हिसा नाट्यमयरित्या रद्द, न्यायालयीन अपील सोमवारपर्यंत स्थगित)

ट्विट

आतापर्यंत जवळपास 20 ग्रँड स्लॅम जिंकलेल्या नोवाक जोकोविच याचा या वेळी मिओमिर केक्मानोविक याच्यासोबत सामना होणार होता. एकूण वेळापत्रकानुसार हा सामना सोमवारी (17 जानेवारी) रोजी खेळला जाणार होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ओपन टूर्नामेंटमध्ये आपल्या पदकाचा बचाव करण्यासाठी तो न्यायालयीन लढाई लढत होता. कारण ही लढाई जिंकली तरच त्याला या टूर्नामेंटमध्ये खेळता येणार होते. मात्र त्याचे स्वप्न खटला हारल्याने पूर्ण होऊ शकले नाही. सन 2021 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये चोकोविच याने डेनियल मेदवेदेव याला 7–5, 6–2, 6–2 अशा फरकाने पराभूत केले होते.