महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवरे याचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी तर बजरंग आणि विनेश यांच्या नावांची खेलरत्नसाठी शिफारस
Bajrang Punia,Vinesh Phogat and Rahul Aware (Photo Credits-Twitter)

आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेत 24 एप्रिल रोजी भारतीय मल्लांनी दोन पदकांची कमाई केली.त्यामध्ये कुस्तीपटू राहुल आवरे (Rahul Aware) याने कांस्यपद पटाकावले आहे. तर त्याच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी ( Arjuna Award) करण्यात आली आहे. तसेच सुवर्णपदक जिंकणाऱ्या  बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि कांस्यपद विजेती विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांच्या नावाची शिफारस कुस्ती महासंघाने राजीव खेल रत्न पुरस्कारासाठी ( Rajeev Khel Ratna) केली आहे.

तसेच राहुल याच्यासोबत हरप्रीत सिंग, दिव्या काकरान आणि पूजा धांडा यांचे नावसुद्धा अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात आले आहे. विरेंद्र कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमार आणि विक्रम कुमारर यांच्या नावाची शिफारस द्रोणाचार्य पुरस्कारासाठी सुचवले आहे.

महाराष्ट्राचा राष्ट्रकूल सुवर्णपदक विजेता राहुल अवारे याने स्पर्धेत 61 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या किम जिनकोएल याला 9-2 अशा गुणफरकाने हरवत कांस्यपदक प्राप्त केले. तर दिपक पुनिया याने 86 किलो वजनी गटात तजाकिस्तानच्या बखुदूर कोदिरोव याचा 8-2 ने पराभव करत कांस्यपदक पटकाविले आहे.(Asian Boxing Championships: अमित पंघल याच्यानंतर पूजा राणी ठरली सूवर्णविजेती, भारताच्या खात्यात 2 Gold Medal)

तर 2018 साठीच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी 57 किलो वजनी गटात सुवर्णपदाचा मानकरी ठरलेला राहुल याच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तर आशियाई स्पर्धेत त्याने दोन कांस्यपदावर आपले नाव कोरले आहे.