आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. साखळी फेरीत एका पाठोपाठ एक पाच संघांना पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. सामन्याच्या पहिल्या हाफमधील पहिल्या सत्रापासून भारताने आक्रमक पवित्रा घेत पहिल्या सत्राच्या शेवटी भारताच्या उत्तम सिंगने गोल मारला आणि 1-0 ने आघाडी मिळवून दिली. शेवटच्या मिनिटाला दक्षिण कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. दुसऱ्या सत्रात भारताला काही मिनिटातच पेनल्टी कॉर्नर मिळाला. कोरियाने रेफरल घेतला होता. पण निर्णय भारताच्या बाजूने लागला. या संधीचं सोनं कर्णधार हरमनप्रीत सिंगने केलं. पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये केलं आणि भारताला 2-0 अशी आघाडी दिली. (हेही वाचा - India Beat Pakistan, Asian Champions Trophy Hockey 2024: आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा 2-1 ने उडवला धुव्वा, सलग 5व्या विजयाची केली नोंद)
पाहा पोस्ट -
The Indian men's hockey team has secured a spot in the Asian Champions Trophy final after a convincing 4-1 victory over South Korea. They will face China in the final on September 17, 2024.
A strong performance as India aims for their fifth title.#HockeyIndia… pic.twitter.com/Wx0zqynT7h
— DD News (@DDNewslive) September 16, 2024
जरमनप्रीत सिंगने तिसरा गोल मारत दक्षिण कोरियाला बॅकफूटवर ढकललं. पण तीन गोलची आघाडी पुन्हा एकदा एका गोलने कमी झाली. दक्षिण कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि गोल मारण्यात यश मिळालं. त्यामुळे 3-1 अशी स्थिती आली. तिसरा सत्राचा खेळ संपला तेव्हा भारताने 4-1 ने आघाडी घेतली. हरमनप्रीत सिंगने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 7 गोल मारले आहेत. चौथ्या सत्रात दोन्ही बाजूने एकही गोल झाला ाही. भारताने या विजयासह दक्षिण कोरियाविरुद्ध 39 व्या विजयाची नोंद केली
टीम इंडिया : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), क्रिशन पाठक (गोलकीपर), जरमनप्रीत सिंग, सुमीत, अमित रोहिदास, मनप्रीत सिंग, विकेट सागर प्रसाद, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजीत सिंग, अरजीतसिंग हुंदाल.