Asian Champions Trophy Hockey 2024: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी (Asian Champions Trophy Hockey 2024) स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सलग पाचवा विजय मिळवला आहे. गटातील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. संघाच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार हरमनप्रीत सिंग, त्याने पेनल्टी कॉर्नरद्वारे 2 गोल केले. पाकिस्तानने स्कोअरिंगला सुरुवात केली असली तरी टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत सामना 2-1 असा जिंकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)