Shoaib Malik Second Wedding: सानिया मिर्झाशी घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत केलं दुसर लग्न; See Photos
Shoaib Malik-Sana Javed Wedding (फोटो सौजन्य - Instagram)

Shoaib Malik Second Wedding: माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा क्रिकेटर पती शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या वैवाहिक जीवनात फूट पडल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. अलीकडेच दोघे वेगळे झाल्याची बातमी समोर आली होती. आता शोएब मलिकने दुसरे लग्न केले आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) सोबत दुसरा विवाह केला आहे. 20 जानेवारी 2024 रोजी, शोएब आणि सना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विवाहाची छायाचित्रे शेअर करून लग्नाची घोषणा केली.

फोटोंमध्ये शोएब आणि सना एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत. फोटोसोबत शोएबने कॅप्शनमध्ये लिहिले की, "ल्हम्दुलिल्लाह।. आणि आम्ही तुम्हाला पेयर्समध्ये तयार केले आहे." लग्नाच्या फोटोंमध्ये शोएब मलिक शेरवानीमध्ये दिसत आहे. तर सना जावेद पेस्टल ग्रीन ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. तिने भारी दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला. पहिल्या फोटोत दोघे मिठी मारून पोज देत आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये शोएब त्याच्या पत्नीच्या प्रेमात मग्न होताना दिसत आहे. (हेही वाचा -Sania Mirza-Shoaib Malik Divorce: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला? पाकिस्तानी क्रिकेटरने केली फसवणूक- Reports)

पहा फोटोज - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

सना जावेदने बदलले आडनाव -

सना जावेदने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचे नावही बदलले आहे. तिने आपल्या नावासमोर शोएब मलिक हे आडनाव जोडले आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 मध्ये लग्न केले होते. दोघांना एक मुलगाही आहे. गेल्या वर्षभरापासून सानिया आणि शोएबच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या येत होत्या. अलीकडेच सानियानेही शोएबसोबत घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. (वाचा - सानिया मिर्झा-शोएब मलिक यांनी हसन अली आणि सामिया आरजू यांना दिली लग्नाची पार्टी, पहा Photo)

कोण आहे सना जावेद?

सना जावेद ही पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'कहानी', 'ए मुश्त-ए-खाक', 'रोमियो वेड्स हीर', 'रुसवाई', 'डांक' आणि 'डर खुदा से' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या सना 'सुकून' या टीव्ही मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सना जावेदचेही हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिचा विवाह उमर जसवालसोबत झाला होता.