Golf Player Grayson Murray (PC - Instagram)

Golf Player Grayson Murray Passes Away: अमेरिकन गोल्फपटू ग्रेसन मरे (Grayson Murray) यांचे शनिवारी संध्याकाळी वयाच्या 30 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाची घोषणा पीजीए टूर आयुक्त जय मोनाहन यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण उघड झालेले नाही. पीजीए टूरने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीजीए टूर कमिशनर यांनी ग्रेसनच्या पालकांची भेट घेतली असून शोक व्यक्त केला.

'आम्ही हे ऐकून खूपचं उद्ध्वस्त झालो असून ही बातमी शेअर करताना आम्हाला दु:ख होत आहे. PGA टूर खेळाडू ग्रेसन मरे यांचे आज सकाळी निधन झाले. पीजीए टूर हे एक कुटुंब आहे. आम्ही ग्रेसनसाठी शोक करतो आणि त्याच्या प्रियजनांसाठी सांत्वनासाठी प्रार्थना करतो,' असं जय मोनाहन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा -Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: नताशा स्टॅनकोविक हिने इंस्टाग्रामवरून पांड्या आडनाव हटवले; सोशल मीडियावर घटस्फोटाची चर्चा)

मी ग्रेसनच्या पालकांशी शोक व्यक्त करण्यासाठी संपर्क साधला आणि त्या संभाषणादरम्यान, त्यांनी आम्हाला स्पर्धा खेळणे सुरू ठेवण्यास सांगितले, असंही आयुक्त मोनाहन यांनी सांगितलं. ग्रेसन मरेच्या निधनाच्या बातमीने शनिवारी संध्याकाळी गोल्फच्या जगाला धक्का बसला. त्याच्या आकस्मिक निधनाच्या एक दिवस आधी, ग्रेसने आजारपणाचे कारण देत वसाहती राष्ट्रीय आमंत्रण किंवा चार्ल्स श्वाब चॅलेंजमधून माघार घेतली होती.