Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: नताशा स्टॅनकोविक हिने इंस्टाग्रामवरून पांड्या आडनाव हटवले; सोशल मीडियावर घटस्फोटाची चर्चा

हार्दिक पंड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. त्यांच्या घटस्फोटासंबंधीत नवनव्या गोष्टी समोर येत असतानाच नताशाने इंस्टाग्रामवरून पांड्या आडनाव हटवले आहे. असे असले तरी, अद्याप दोन्ही बाजूंकडून घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतीच प्रतिक्रीया आलेली नाही.

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: नताशा स्टॅनकोविक हिने इंस्टाग्रामवरून पांड्या आडनाव हटवले; सोशल मीडियावर घटस्फोटाची चर्चा
Photo Credit-Instagram

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्स (MI) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या(Hardik Pandya) याच्या आयुष्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. पत्नी नताशा स्टॅनकोविक(Natasha Stankovic)सोबत तो विभक्त होत असल्याच्या सध्या चर्चा आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे एकत्र दिसलेही नव्हते. आता तर नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पंड्याचे आडनाव काढून टाकले आहे. सोशल मीडियात तर असा दावा केला जात आहे की, नताशाने या दोघांचा घटस्फोटत (Hardik Pandya Natasha Stankovic Divorce)हार्दिकची ७० टक्के संपत्ती पोडगी म्हणून मागितली आहे. असे असले तरी, अद्याप दोन्ही बाजूंकडून घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतीच प्रतिक्रीया आलेली नाही. (हेही वाचा:Hardik Pandya Net Worth: हार्दिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा 70 टक्के मालमत्ता घेणार का? जाणून घ्या पांड्याकडे किती आहे मालमत्ता )

दरम्यान, लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे जिथे प्रत्येक खेळाडूच्या पत्नी त्यांच्या सपोर्टमध्ये चिअर्स करण्यासाठी मैदानात हजेरी लावत असताना नताशा यंदाच्या संपूर्ण आयपीएलमधून गायब होती. मुंबईतील कोणत्याही सामन्यासाठी चिअर्स करण्यासाठी नताशा स्टेडियमवर आली नाही.

२०२० रोजी झाले होते लग्न

नताशा ही एक अभिनेत्री आहे. हार्दिक आणि ती ३१ मे २०२० रोजी लग्नबंधणात अडकले होते. त्याच वर्षी ३० जुलै रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलगा अगस्त्य याचा जन्म झाला. त्यानंतर दोघांनी गेल्या फेब्रुवारीत व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने लग्न केले. राजस्थानमधील उदयपूरमध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडला होता.

(The above story first appeared on LatestLY on May 26, 2024 09:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).