All England Championship 2021: ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये (All England Championship) शुक्रवारी भारताचा युवा स्टार खेळाडू लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) नेदरलँड्सच्या मार्क कालजो (Mark Caljouw) याच्याशी संघर्षपूर्ण उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. 19 वर्षीय लक्ष्य सेनला सेमीफायनल गाठून इतिहास रचण्याची संधी होती.सेनशिवाय अश्विनी पोनप्पा (Ashwini Ponnappa) आणि एन सिक्की रेड्डीच्या (N Sikki Reddy) महिला जोडीला देखील उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्सच्या सेलेना पीक आणि चेरील सीनेनच्या जोडीविरुद्ध सलग सेटमध्ये पराभूत झाल्यावर भारतीय महिला जोडीचे ऑल इंग्लंड बॅडमिंटन (All England Badminton) चॅम्पियनशिपमधील आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत 30व्या क्रमांकाच्या भारतीय जोडीला 39 मिनिटे चाललेल्या सामन्यात सेलेना आणि चेरिलच्या 24 व्या क्रमांकाच्या जोडीकडून 22-24 12-21 असा पराभव पत्करावा लागला. अश्विनी आणि सिक्की यांनी यापूर्वी गुरुवारी रात्री 33 मिनिटांच्या सामन्यात गॅब्रिएला स्टोइवाह आणि स्टेफनी स्टोइवा या 13स्टोइवाह आणि स्टेफनी स्टोइवा या 13व्या क्रमांकाच्या बल्गेरियन जोडीचा 21-17, 21-10 असा पराभव केला होता.
जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकाच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि सहाव्या मानांकित चिराग शेट्टीची जोडी देखील पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली. पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत त्यांना डेन्मार्कच्या किम अॅस्ट्रॉप आणि अँडर्स स्कारुप रासमसनने जोडीने त्यांचा तीन सेटमध्ये 16-21, 21-11, 17-21 असा पराभव केला. विशेष म्हणजे, या महिन्याच्या सुरूवातीला स्विस ओपन स्पर्धेनंतर त्यांना जगातील 13व्या क्रमांकाच्या जोडीकडून सलग दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. पुरुष एकेरीत समीर वर्मालाही तिसर्या मानांकित डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनकडून सलग दुसर्या पराभवाचा सामना करावा लागला. समीरचा दुसऱ्या फेरीत 22-20, 21-10 असा पराभव झाला. ध्रुव कपिला आणि मेघाना जक्कमपुडीच्या मिश्रा जोडीला डेन्मार्कच्या निकलास नोहर आणि अॅमेली मॅजेलुंडलाने 19-21, 8-21 अशा सलग दोन सेटमध्ये पराभूत केले.
दुसरीकडे, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधू आपला उपांत्यपूर्व सामना शुक्रवार जपानच्या अकाने यामागु हिच्याविरुद्ध खेळले. लक्ष्या सेन भारताच्या चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक उल्लेखनीय कामगिरी करणारा ठरला. स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार्या लक्ष्यने एक अद्भुत खेळ केला आणि क्वार्टर-फायनलमध्ये प्रवेश केला. यापूर्वी, सेनने आशियाई जुनिअर चॅम्पियनशिप विजेतेपद, वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप कांस्य आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धेचे रौप्यपदक देखील जिंकले आहेत.