बलबीर सिंह सीनियर | फाइल फोटो | (Photo Credits- Facebook @balbirsinghsenior)

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉकीपटू बलबीर सिंह सिनिअर (Balbir Singh Sr) यांना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल केले आहे. दिग्गज हॉकीपटूची (Hockey) प्रकृती चिंताजनक आहे. मोहालीच्या (Mohali) रुग्णालयात दाखल असलेल्या बलबीर सिंह सिनिअर यांना शुक्रवारी संध्याकाळी अचानक झालेल्या आजारानंतर आज सकाळी म्हणजेच मंगळवारी सकाळी 9 वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. ते अजूनही आयसीयूमध्ये दाखल आहे. 95 वर्षीय माजी हॉकी खेळाडूच्या तब्येतीत थोडा सुधार झाल्याचे दिसत होते, पण आता त्यांची प्रकृती गंभीर आहे. "डॉक्टर त्यांच्यावर निरंतर नजर ठेवतात आणि आता त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतेही विधान प्रसिद्ध करण्यापूर्वी डॉक्टर पुढच्या 24 ते 48 तासांपर्यंत त्यांच्या प्रकृतीचे सातत्याने आकलन करत आहेत. ते व्हेंटिलेटरवर आहे," त्याच्या प्रकृतीवर अद्यतन देताना 96 वर्षीय ज्येष्ठ दिग्ग्जच्या नातूने सांगितले. शुक्रवारी, 8 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) मध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकण्यात बलबीरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँडविरुद्ध 6-1 ने जिंकत त्यांनी पाच गोल केले आणि अद्याप हा विक्रम अबाधित आहे. शिवाय, ते 1975 च्या वर्ल्डकप जिंकणार्‍या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापकही होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक इतिहासात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडलेल्या 16 दिग्गजांपैकी बलबीर सीनियर एकमेव भारतीय होते. 1957 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बलबीर, भारताच्या 1975 वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक आणि 1971 मध्ये कांस्य पदकजिंकणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.

डॉक्टर्सने यापूर्वी त्यांचा कोरोना व्हायरस चाचणीही केली ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला. 2018 मधेही निमोनियामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यावेळी त्यांना 90 दिवस पीजीआयमध्ये दाखल केले होते.