Neeraj Chopra (PC - Twitter)

Neeraj Chopra Won Diamond League Trophy: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) ने डायमंड लीग (Diamond League) फायनलचे विजेतेपद पटकावले आहे. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 88.44 मीटर भालाफेक करून ट्रॉफीवर कब्जा केला. भालाफेकपटू नीरज चोप्राने स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे डायमंड लीग फायनलचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे.

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. पहिल्या फेरीत नीरजचा थ्रो फाऊल होता. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर, पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर भाला फेकला. (हेही वाचा - Virat Kohli Century: विराट कोहलीने आपले 71 वे शतक 'या' दोन खास व्यक्तीनां केले समर्पित, ऐतिहासिक खेळीनंतर दिले हे वक्तव्य)

नीरज चोप्राचा पहिलाच प्रयत्न फाऊल थ्रोचा होता. नीरजसाठी ही सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या फेरीत जेकोब व्दलेजने, पॅट्रिक्स गेल्म्स आणि ज्युलियन वेबर यांनी आघाडी घेतली. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 88.44 मीटर फेक केली. या थ्रोसह नीरजने या फेरीत आघाडी घेतली. या फेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता याकुब वडलेगेने 86.00 मीटर फेक केली.

नीरज चोप्रा तिसरा प्रयत्न 88.00 मीटर भालाफेक केली. या प्रयत्नातही नीरज वाढतच गेला. नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर फेक नोंदवला. त्यानंतर पाचव्या प्रयत्नात त्याने 87.00 मीटर भालाफेक केली. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.