मीराबाई चानू आणि विराट कोहली (संपादित आणि संग्रहीत प्रतिमा)

भारतीय खेळ विश्वात सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. PIB ने केलेल्या ट्विटनुसार क्रिकेटर विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीरबाई चानू या दोघांना 2018 सालाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. विराट कोहली आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे तर वेटलिफ्टर मीरबाई चानूने वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताला 22 वर्षांनंतर सुवर्ण पदक मिळावून दिले आहे. यापूर्वी क्रिकेट या खेळात महेंद्र सिंग धोनी आणि सचिन तेंडुलकरला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

 

25 सप्टेंबर 2018 रोजी राष्ट्रपती भवनात मीरबाई चानू आणि विराट कोहलीला राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासोबतच द्रोणाचार्य अवॉर्ड, अर्जुन अवॉर्ड, ध्यानचंद अवॉर्ड या खेळ क्षेत्रातील इतर मानाचे अवॉर्ड्सही जाहीर करण्यात आले आहेत.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार स्वरूप

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार आहे, माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. विशिष्ट खेळात मागील वर्षभरात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूचा या पुरस्काराने गौरव केला जातो. पदक,प्रशस्तीपत्रक आणि 7.5

लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप असते.