शार्दूल ठाकूर (Photo Credit: Twitter/ICC)

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने (Mumbai Team) रणजी ट्रॉफी 2023-24 च्या ( Ranji Trophy 2024) अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या पहिल्या डावात 109 चेंडूत 107 धावा ठोकणाऱ्या शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. शार्दुलच्या शतकी खेळाच्या जोरावर सेमी फायनलमध्ये मुंबईने तमिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव केला. रणजी ट्रॉफीचा दुसरा सेमी फायनल सामना हा विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात सुरू आहे. या सामन्यातील विजेत्या संघासोबत मुंबई 10 मार्चला अंतिम सामना खेळणार आहे.  (हेही वाचा - Shardul Thakur First-Class Century: शार्दुल ठाकूरने तामिळनाडूविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पहिले फर्स्ट क्लास शतक झळकावले)

पाहा पोस्ट -

सेमी फायनलमध्ये तमिळनाडूने प्रथम फलंदाजी करत 146 धावा केल्या होत्या. मुंबईकडून तुषार देशपांडेने भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर, मुशीर खान आणि तनुष कोटियान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तमिळनाडूकडून विजय शंकरने 44 तर वॉशिंग्टन सुंदरने 43 धावांचे योगदान दिले होते. यानंतर मुंबईने आपल्या पहिल्या डावात 378 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 104 चेंडूत 109 धावा ठोकल्या.

पहिल्या डावात 232 धावांची मोठी आघाडी घेणाऱ्या मुंबईने तमिळनाडूचा दुसरा डाव हा 162 धावात संपवला. दुसऱ्या डावात शम्स मुल्लाणीने भेदक मारा करत 4 विकेट्स घेतल्या तर त्याला शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, तनुष कोटियान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.