मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit- File Photo)

सायंकाळी 8 वाजता तीन वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आपली मागील वर्षीची निराशाजनक कामगिरी विसरून पुन्हा एकदा या 12 व्या पर्वातील पहिला सामना खेळण्यास तयार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध हा सामना रंगणार आहे. मुंबई संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई संघाची धुरा ही मुंबईकर रोहित शर्मा याच्यावर आहे तर, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मुंबईचा श्रेयस अय्यर करत आहे.

पहिल्याच सामन्यात मुंबईचा संघ बाजी मारतो की दिल्लीचा, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. या सामन्यात साऱ्यांचे लक्ष लागून असेल ते युवराज सिंगवर. तसेच मुंबई संघाच्या संचालकपदी झहीर खान याची नियुक्ती झाल्यामुळे गोलंदाजीत मुंबई दिल्लीवर भारी पडेल असे चित्र दिसत आहे. तर दिल्ली डेअरडेव्हिल्सवरून दिल्ली कॅपिटल्स असे नामकरण झालेल्या या नवीन संघाला यंदा शिखर धवनची साथ असणार आहे.

दोन्ही संघ -

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, क्रुनाल पांड्या, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, मयंक मारकंडे, राहुल चहर, अनुकृति रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डीकॉक, एव्हिन लुईस, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅकक्लेनेघन, एडम मिल्ने, जेसन बियररेनडर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर शरण, पंकज जायसवाल, रसिख सलाम, युवराज सिंह.

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतीया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलिन मुनरो, क्रिस मॉरिस, कगिसो रबादा, संदीप लामिछणे, ट्रेंट बाउल्ट , शिखर धवन, हनुमा विहारी, अक्षर पटेल, इशांत शर्मा, अंकुश बन्स, नाथू सिंह, कॉलिन इनग्राम, शेरफेन रदरफोर्ड, केमो पॉल, जलज सक्सेना, बंडारू अयप्पा.