मोहम्मद सिराज (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या आगामी T20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर आशिया कप (Asia Cup) 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंगलाही (Arshdeep Singh) स्थान मिळाले आहे. 2022च्या टी20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचा कर्णधार असेल, तर केएल राहुलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.  मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंना या संघात स्थान मिळालेले नाही.

मात्र, मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यर राखीव खेळाडू म्हणून संघासह ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शानदार पदार्पण केले आहे. खरं तर, काउंटी चॅम्पियनशिपमधील पहिला सामना खेळत असलेल्या मोहम्मद सिराजने सॉमरसेटविरुद्ध वारविकशायरकडून 5 विकेट घेतल्या होत्या. हेही वाचा ICC T20 World Cup 2022 साठी Team India Jersey लवकरच होणार लॉन्च (Watch Video)

मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीसमोर सॉमरसेट पहिल्या डावात अवघ्या 219 धावांत गारद झाला. मोहम्मद सिराजबद्दल बोलायचे झाले तर या वेगवान गोलंदाजाने 24 षटके टाकली. मोहम्मद सिराजने 24 षटकांत 82 धावांत 5 खेळाडू बाद केले.  त्याने पाकिस्तानच्या इमाम उल हकला आपला पहिला बळी बनवला. मोहम्मद सिराजने पाकिस्तानच्या इमाम-उल-हकला बाद केल्यानंतर जॉर्ज बार्टलेट आणि जेम्स रेव्हला पॅव्हेलियनमध्ये पाठवून सॉमरसेटची कंबर मोडली.

याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाजाने लुईस ग्रेगरीला बाद केले. सॉमरसेटचा फलंदाज लुईस ग्रेगरीने 60 धावा केल्या. मोहम्मद सिराजने भारतासाठी आतापर्यंत  13 कसोटी सामने खेळले आहेत. मोहम्मद सिराजने भारतासाठी 13 कसोटी सामन्यात 30.77 च्या सरासरीने 40 बळी घेतले आहेत. मोहम्मद सिराजने आतापर्यंत कसोटी सामन्यात एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत 73 धावांत 5 कांगारू खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.