Manika Batra Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक(Paris Olympic)मध्ये महिलांच्या टेबल टेनिस(Table Tennis) राऊंड 64 च्या फेरीत भारतीय खेळाडू मनिका बत्रा (Manika Batra)आणि ग्रेट ब्रिटनची ॲना हर्सी (Anna Hersi)यांच्यात सामना खेळवला गेला. मनिकाने ॲना हर्सीवर शानदार विजय मिळवून आपल्या मोहीमेला सुरूवात केली. तिने महिला एकेरी टेनिस स्पर्धेत 32 च्या फेरीत प्रवेश केला आहे. टेबल टेनिसच्या राऊंड ऑफ 64 मधून राऊंट ऑफ 32 मध्ये पोहोचणारी मनिका बत्रा दुसरी भारतीय महिला ठरली आहे. तिच्याधी श्रीजा अकुला हिने विजय मिळवत पुढची फेरी गाठली. तिने ग्रेट ब्रिटनच्या ॲना हर्सीचा 4-1 असा पराभव केला. तिने पहिला गेम 11-8, दुसरा गेम 12-10, तिसरा गेम 11-9 आणि पाचवा गेम 11-5 असा जिंकला. तिने फक्त एकच गेम गमावला. जेव्हा तिने हर्सीकडून चौथा गेम 9-11 ने गमावला. (हेही वाचा: PV Sindhu Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूची दमदार सुरूवात; मालदीवच्या फतिमा नबाहवर विजय)
पोस्ट पहा
#ParisOlympics2024 | India's Manika Batra wins the Table Tennis match against Great Britain's Anna Hursey by 4-1. Advances to the round of 32.
— ANI (@ANI) July 28, 2024
नेमबाजीत भारताच्या मनु भाकेरने कांस्य पदक जिंकले आहे. यंदाच्या ऑलिम्पिक 2024 मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. पॉईंट 1 गुणाने मागे राहिल्याने मनु भाकेरला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. कोरियाच्या नेमबाजाने आघाडी मिळवली. मनू भाकेरने अंतिम सामन्यात 221.7 गुणांसह हे पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. मनू भाकेर 21व्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, पण अखेरीस ती तिसऱ्या स्थानावर राहिली.
कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. मनु भाकेर ही भारताला नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. सुरूवातीपासूनच मनु दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम होती पण अवघ्या एका पॉईंटने मनु मागे राहिली. पण तिने भारताला पदक पटकावून दिलं.
रमिता जिंदालने 10 मीटर एअर रायफल महिला पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळवून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. तिने 631.5 गुण मिळवले. रमिताची सुरुवात संथ होती पण तिने हळूहळू पुनरागमन केले आणि शेवटच्या सिरीजमध्ये पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले.