ड्वेन ब्राव्हो (Photo: Getty Images)

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) संघाबाहेर असून तो मैदानात उतणार की निवृत्ती घेणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच वेस्ट इंडीज मुख्य गोलंदाज ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महेंद्र सिंह धोनी याने अजूनही क्रिकेट मधून निवृत्ती घेतली नाही. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनी मैदानात खेळताना दिसेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यात धोनीला संधी देण्यात येणार आहे, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, बीसीसीआयने रिषभ पंतला पसंती दर्शवली होती.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर धोनी मैदानात दिसलेला नाही. धोनीच्या भविष्यासंदर्भात विराट कोहली पासून ते सौरव गांगुली या सर्वांनी त्यांची मते मांडली आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. धोनी टीम इंडियाकडून खेळणार या यासंदर्भात आता वेस्ट इंडीजचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो यांनी वक्तव्य केले आहे. "महेंद्र सिंह धोनीने क्रिकेटमधून निवृ्त्ती घेतलेली नाही. मला वाटते की तो पुढच्या होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळताना दिसेल. सध्या धोनी हा संघाबाहेर जरी असला तरीदेखील त्याने क्रिकेटच्या बाहेरील गोष्टीचा स्वत:वर परिणामी होऊ दिला नाही. कोणत्याही परिस्थितीला न घाबरता, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवावे हेच त्याने आम्हाला शिकवले आहे. तो पुढील वर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कप खेळेल याबाबत मला कोणतही शंका नाही", असे ब्राव्होने सांगितले. हे देखील वाचा- India Vs West Indies ODI Match: दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार टीम इंडियातून बाहेर; मुंबईचा खेळाडू शार्दुल ठाकूर याला मिळाली संधी

ड्वेन ब्रोव्होन गेल्या काहीदिवसांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात पुन्हा एकदा खेळणार असल्याचे त्याने जाहीर केले. माहितीनुसार, ब्रोव्हो हा केवळ टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागम करणार असल्याचे सांगितले.