Maharashtra Kesari 2019-20 Day 3 Live Streaming: 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी रंगणार खास सामने; 'इथे' पहा लाईव्ह स्ट्रिमिंग़
Kusti Image For Representation (Photo Credits: Instagram)

लाल मातीचा रांगडा खेळ म्हणजे कुस्ती (Kusti) आणि या कुस्तीची सर्वोच्च मानाची स्पर्धा म्हणजे 'महाराष्ट्र केसरी'. यंदाची 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari Kusti) स्पर्धा पुण्यातील (Pune) बालेवाडीमध्ये (Balevadi) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला 3 जानेवारीपासून सुरुवात झाली असून  पहिल्या दिवसापासूनच अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. आज, रविवार, 5 जानेवारी रोजी या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ पाहता आज देखील पैलवानांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे हे निश्चित. अशी ही टक्कर जर अगदी घरबसल्या क्षणोक्षणीच्या अपडेट्स सहित प्रत्यक्ष पाहायची असेल तर युट्युबवर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद या पेजवर खास लाईव्ह स्ट्रीमिंगची सोय करण्यात आली आहे.Maharashtra Kesari Final 2020 Live Streaming: कुस्तीवीर हर्षवर्धन सदगीर विरूद्ध शैलेश शेळके मध्ये रंगणार 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' चा अंतिम सामना; इथे पहा लढतीचे लाईव्ह स्ट्रिमिंग.  

■ रविवार दिनांक 5 जानेवारी 2020 कुस्ती वेळापत्रक

●सकाळी 8 ते दुपारी 12 वाजता कुस्ती स्पर्धा "क" विभाग. (74,92 व महाराष्ट्र केसरी गट)

◆दुपारी 12 ते 1 वैद्यकीय तपासणी व वजन "ड"विभाग. (65 व 97 किलो वजनी गट)

◆दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजता- कुस्ती स्पर्धा "क" व "ड"विभाग. (65, 94, 92, 97 व म.के गट)

दरम्यान, यंदा मातीवरील कुस्तीसाठी 2 आणि मॅटवरील कुश्तीसाठी 2 आखाडे बनवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या यंदाच्या स्पर्धेसाठी 900 ते 950 खेळाडू आणि 125 अंपायर बालवाडीत दाखल झाले आहेत. या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी नक्की फॉलो करा लेटेस्टली मराठी!