Khelo India Youth Games: गुणतालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानी; 17 सुवर्ण पादकांसह उत्तर प्रदेश-दिल्ली बरोबरीत
खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 (Photo Credit: IANS)

गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये (Khelo India Youth Games) महाराष्ट्राने (Maharashtra) गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. महाराष्ट्राने दिवसाचा खेळ संपला तेव्हा 28 सुवर्ण, 32 रौप्य आणि 50कांस्य पदकांसह एकूण 110 पदकांची कमाई केली आहे. 15 जानेवारीला झालेल्या खेळात आसामने सुवर्ण पदकांची संख्या 6 वर नेली. 17 सुवर्णपदकं पणाला लागली असताना महाराष्ट्र आणि हरियाणाने (Haryana) प्रत्येकी दोन पदकांची कमाई करत पदकांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. 28 सुवर्ण पदकासह महाराष्ट्र अव्वल, तर हरियाणाने 23 सुवर्ण पदकं जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे. बुधवारी महाराष्ट्राने दोन सुवर्णपदके जिंकली. 21 वर्षांखालील मुलींमध्ये कोल्हापूरच्या पूजा बबन डानोले हिने चौथे सुवर्णपदक जिंकले आणि मयूर पवार 17 वर्षांखालील गटातील सर्वात वेगवान पुरुष ठरला. दिवसअखेरीस हरियाणाच्या अंडर-17 रायडर अरब सिंगने मुलांचा वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकला तर अंजली चौधरीने 21 वर्षाखालील 25 मीटर अंतरावरील पिस्तूल नेमबाजीचे विजेतेपद पटकावले. (Khelo India Youth Games 2020 Schedule: जाणून घ्या गुवाहाटीमधील खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक)

17 वर्षांखालील उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) व्हॉलीबॉल संघाने उत्तराखंडविरुद्ध लढत जिंकत दिल्लीच्या (Delhi) पुढे तिसर्‍या स्थानावर झेप घेतली. उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे प्रत्येकी 17 सुवर्णसह एकूण 48  पदकं आहे, मात्र दिल्ली रौप्य पदकाच्या मोजणीत मागे राहिले. पश्चिम बंगालने (West Bengal) स्प्रिंट सायकल चालक त्र्यशा पॉल, अंडर 21 मिश्र टीम रायफल नेमबाज आयुषी पोद्दार आणि अमर्त्य मुखर्जी तसेच मुलींच्या अंडर-17 व्हॉलीबॉल पथकाने काल एकूण तीन सुवर्ण पदकं जिंकली. बुधवारी केरळच्या (Kerala) अंडर -21 मुलींच्या व्हॉलीबॉल संघानेएकमेव सुवर्ण जिंकले.

दुसरीकडे, झारखंडच्या अभिषेक लाकराविरुद्ध 21-10 सा विजय मिळवणाऱ्या 19 वर्षीय सुरजित बुरहाघोईनने लॉन बाउल्सच्या अंडर-21 एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. फरीदाबादच्या विक्रांत पांचाळने 4 x 400 मीटर रिले शर्यतीत शानदार प्रदर्शन करून सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत विक्रांतने सोनेपतचे अमित बालियान, रोहतकचे आयुष डबास आणि हिसारचे लक्ष्दीप यांच्याशी जोडी जमवून विजय मिळवला. विक्रांतने या शर्यतीतील जुने राष्ट्रीय विक्रमही मोडला. 4 x 400 रिले शर्यतीचा विक्रम केरळमधील खेळाडूच्या नावावर होता, पण आता तो विक्रांतच्या नावे झाला आहे.