दिल्ली (Delhi) भाजप खासदार आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना ISIS काश्मीरने तिसऱ्यांदा गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 28 नोव्हेंबरच्या रात्री त्यांना धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. इतकंच नाही तर यावेळी ईमेलमध्ये दिल्ली पोलिसांचा (Delhi Police) उल्लेख करत त्यांच्या सुरक्षेत असलेले पोलिसही काही करू शकणार नाहीत, असंही म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ISIS काश्मीरकडून गंभीरला एक ई-मेल पाठवण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यात दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता चौहान (IPS Shweta Singh Chauhan) देखील काही करू शकत नाहीत, असे लिहिले आहे. यासोबत असे म्हटले आहे की, आमचे गुप्तहेर दिल्ली पोलिसांच्या आत आहेत जे आम्हाला तुमच्याबद्दल सर्व माहिती देत आहेत.
गौतम गंभीरच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे
यापूर्वीही, गौतम गंभीरला अलीकडच्या काही दिवसांत दोन धमकीचे ई-मेल आले होते, ते ISIS काश्मीरनेही पाठवले होते. यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तर गौतम गंभीरला यापूर्वी आलेल्या ईमेलची सायबर सेलकडून चौकशी केली जात आहे.
गौतम गंभीरने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. गंभीर प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो. याशिवाय गंभीर त्याच्या विरोधी पक्षातील नेत्यांवर केलेल्या वक्तृत्वामुळे चर्चेत राहतो. (हे ही वाचा IND vs SA 2021-22: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर BCCI चे मोठे भाष्य, म्हणाले - ‘दौरा कायम, पण खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरि.)
अलीकडेच त्यांनी माजी किक्रेट पटू नवज्योतसिंग सिद्धूला घेरले. काही दिवसापुर्वी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपला 'मोठा भाऊ' म्हटले होते. तेव्हा गंभीर यांनी नवज्योतसिंगवर निशाना साधला कि आधी तुमच्या मुलांना सीमेवर पाठवा आणि मग अशी वक्तव्ये द्या, असे सांगितले. भारत 70 वर्षांपासून पाकिस्तान आणि दहशतवादाविरुद्ध लढत आहे आणि सिद्धूने दहशतवादी देशाच्या पंतप्रधानांना आपला मोठा भाऊ म्हणणे लज्जास्पद आहे, असेही गौतम गंभीर म्हणाले. भारतीय संघाचा भक्कम आणि ओपनर फलंदाज गौतम गंभीर 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा महत्वाचा एक भाग होता.