Rohit Sharma Injury: ‘IPL खेळणं देशापेक्षा जास्त महत्वाचं का?’ MI कर्णधार रोहित शर्माला दिलीप वेंगसरकर यांचा सवाल
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: Twitter/mipaltan)

Rohit Sharma Injury: रोहित शर्मा (Rohit Sharma) हा सध्याच्या काळातील विश्व क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे पण त्याने आपल्या फिटनेसच्या बाबतीत भारतीय क्रिकेट चाहत्यांना चिंतेत टाकले आहे. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) तीन सामन्यांचा मुकल्यानंतर आणि दुसर्‍या क्रमांकाच्या हॅमस्ट्रिंग टीयरमुळे ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावरुन वगळण्यात आल्यावर रोहितने सणरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यातून आयपीएलमध्ये (IPL) पुनरागमन केले. दुखापतीची स्थितीचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अधिकृतपणे स्पष्ट केले नसल्याने रोहितला टॉससाठी बाहेर पडताना पाहून बरेचसे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत निवडीच्या बाबींवर संशय घेणारे बीसीसीआयचे माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी काही जोरदार योग्य प्रश्न विचारले. (Rohit Sharma Injury Update: रोहित शर्माने वादानंतर आपल्या दुखापतीवर दिले अपडेट, सांगितली संपूर्ण परिस्थिती)

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी निवड न झाल्याने टी-20 लीग रोहितसाठी राष्ट्रीय कर्तव्यपेक्षा अधिक महत्त्वाची आहे का, असे या माजी क्रिकेटपटूने विचारले.देशाऐवजी आयपीएलची निवड केल्याच्या आरोपाखाली अनेकांनी रोहितला खडेबोल सुनावले. "आता इथे प्रश्न असा आहे की, आयपीएल त्याच्यासाठी भारतासाठी खेळण्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे का? त्याच्यासाठी देशासाठी खेळण्यापेक्षा क्लब अधिक महत्त्वाचा आहे का? यावर बीसीसीआय कारवाई करेल? किंवा बीसीसीआयच्या फिजिओने रोहितच्या दुखापतीचे योग्य निदान करण्यात अपयशी ठरले," त्यांनी म्हटले.

गेल्या रविवारी रोहितसाठी फिटनेस टेस्ट आयोजित करण्यात आली होती, ज्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, रोहितच्या प्रगतीवर येत्या काही दिवसांवर नजर ठेवण्यात येणार आहे ज्याच्या आधारे त्याला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात येणार आहे किंवा नाही. रोहितने स्वत:ला तंदुरुस्त घोषित केल्यामुळे, बीसीसीआय या विषयावर काय भूमिका घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रोहितला द्वितीय श्रेणीच्या हॅमस्ट्रिंगचा त्रास झाल्याचे म्हटले जात आहे. रोहितला यापूर्वी न्यूझीलंड दौऱ्यावरही दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला वनडे आणि कसोटी मालिकेला मुकावे लागले होते.