IPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय
IPL 2019 KKR vs SRH (Photo Credits: File Image)

इंडियन प्रिमियर लिग (Indian Premier League) अर्थातच IPL 2019 स्पर्धेच्या 12 व्या पर्वातील दुसरा सामना आज कोलकाता येथील इडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) मैदानावर खेळला गेला. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि केन विल्यम्सन (Kane Williamson) याच्या नेतृत्वाखालील सनराजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यामध्ये सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 182 धावांचे लक्ष्य कोलकाताने 6 विकेट्स राखून पार केले आणि हा सामना जिंकला.

एका वर्षांनंतर आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या वॉर्नरच्या ( 85) फटकेबाजीने हा सामना गाजला. शंकरने 24 चेंडूंत नाबाद 40 धावा केल्या. त्यात 2 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. बेअरस्टो 39 धावांवर माघारी परतला.

लक्षाचा पाठलाग करताना, कोलकाताचा ख्रिस लीन दुसऱ्याच षटकात माघारी फिरला. उथप्पा आणि नितीश राणा यांनी कोलकाताचा डाव सावरला. त्यानंतर राणाने एका बाजूने फटकेबाजी करताना कोलकाताच्या विजयाच्या आशा जीवंत राखल्या होत्या. पण, 16व्या षटकांत राणा बाद झाला. त्याने 47 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 68 धावा केल्या. राणा बाद झाल्यानंतर आंद्रे रसेलने कोलकाताला विजय मिळवून दिला.