Indian Cricket Team Captain Virat Kohli | File Image| (Photo: Getty Images)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नेहमी त्याच्या खेळीमुळे चर्चेत असतो. त्याने मैदानात केलेली कामगिरीचे भरभरुन कौतूक केले जाते. परंतु भारत विरुद्ध वेस्टइंडीज  (India vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाअखेर विराटने मैदानाबाहेर केलेल्या कामगिरीचे अधिक कौतूक होत आहे. विराट कोहलीने सामना थांबल्यानंतर ज्या पद्धतीने त्याच्या चाहत्यांना प्रतिसाद दिल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या अधिकृत ट्विटरच्या खात्यावर शेअर केला आहे. अनेकांनी या व्हिडिओला मोठी पसंती दिली आहे. तसेच हा व्हिडिओ अधिक वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच दुसरा कसोटी सामना जमाईका येथील सबीना पार्क येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवसा दिवसाअखेर सामना थांबल्यानंतर चाहत्यांनी विराट कोहलीकडे स्वाक्षरीची मागणी केली. या दरम्यान विराटने प्रेक्षकांना सन्मानपूर्वक प्रतिसाद दिला. विराटने हास्यमय चेहरा करुन प्रेक्षकांच्या टी-शर्टवर, बॅटवर आपुलकीने स्वाक्षरी केली. या व्हिडिओ कॅमेरात कैद करण्यात आला असून बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत खात्यावर पोस्ट केला आहे. बीसीसीआयने "विराट सारखा विराटच असू शकतो" अशी पोस्ट करत त्याचे तोंडभरुन कौतूक केले आहे. हे देखील वाचा-ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लिंजर याचा टी-20 क्रिकेटमध्ये पराक्रम, क्रिस गेल याच्यानंतर सर्वाधिक शतकांचा विक्रम

बीसीसीआयचे ट्विट-

विराट कोहली हा भारतीय संघासाठी मोठे योगदान देत आहे. विराट कोहली भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मालिकेवर नाव नोंदवले आहे. विराट कोहली अशीच कामगिरी करत राहावे, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.