IND vs SA T20 2022: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिकेला 28 सप्टेंबरपासून सुरूवात, जाणून घ्या संभाव्य संघ
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: Getty Images)

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांची T20I मालिका (T20 Series) 28 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना केरळची राजधानी तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे होणार आहे. येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर (Greenfield International Stadium) बुधवारी सायंकाळी 7 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. या मैदानावर भारतीय संघ यापूर्वी दोन टी20 सामने खेळला आहे. भारताने एका सामन्यात विजय मिळवला आहे, तर दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मैदानावर टीम इंडिया शेवटची वेळ तीन वर्षांपूर्वी मैदानात उतरली होती. 8 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान होते.

त्यानंतर भारतीय संघाची कमान विराट कोहलीच्या हातात होती. या सामन्यात विंडीज संघाने भारताचा एकतर्फी पराभव केला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या संध्याकाळी 7 वाजल्यापासून तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाईल. भारताविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये स्फोटक फलंदाज रीझा हेंड्रिक्स यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकसह डावाची सुरुवात करेल.

यानंतर कर्णधार टेंबा बावुमा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल.  त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा रेली रोसो फलंदाजी करेल. यानंतर आयपीएल 2022 मध्ये फिनिशर म्हणून कामगिरी करणारे एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलर खेळताना दिसणार आहेत.  त्याचबरोबर अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस सातव्या क्रमांकावर खेळू शकतो. हेही वाचा  County Championship: ग्लॅमॉर्गनच्या Shubman Gill ने ससेक्सविरुद्ध 123 चेंडूत झळकावले शतक

दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या भारत दौऱ्यावर प्रिटोरियसने टी20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती. भारताविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या तीन महत्त्वाच्या वेगवान गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकतो.  याचा अर्थ एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी हे त्रिकूट तिरुअनंतपुरम T20 मध्ये अॅक्शन करताना दिसू शकतात. तर चायनामन फिरकीपटू तबरेझ शम्सी फिरकी विभागाचे नेतृत्व करेल. ड्वेन प्रिटोरियस आणि एडन मार्करामही गोलंदाजीत योगदान देताना दिसणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (क), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा आणि लुइन रोख.