India Vs Bangladesh U19 World Cup Final: अंडर19 वर्ल्डकप 2020 जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना भिडले बांग्लादेशी खेळाडू; पाहा व्हिडिओ

भारत विरूद्ध बांग्लादेश याच्यात रविवारी अंडर19 वर्ल्डकपचा (India vs Bangaldesh U19 Final) अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बांग्लादेशने भारतीय संघाला 3 विकेट राखून पराभूत करत पहिल्यांदाच अंडर19 वर्ल्डकप जिंकला आहे. सामना जिंकल्यानंतर बांग्लादेशी खेळाडू अधिक आक्रमक प्रदर्शन करत मैदानातच भारतीय खेळाडूंना भिडले. यामुळे बांग्लादेशच्या खेळाडूंची जगभरातून नामुष्की केली जात असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ बांग्लादेशच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंच्या समोर जाऊन गैरवर्तणूक केल्याचे दिसत आहे. यामुळे दोन्ही संघात मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावर बांग्लादेश संघाचा कर्णधार अकबर अलीने (Akbar Ali) यासंदर्भात भारतीय संघाची माफी मागितली होती.

भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यात नुकताच अंडर19 वर्ल्डकपचा अंतिम सामना पार पडला. या समान्यात बांग्लादेश संघाने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजी करण्याची आव्हान दिले होते. प्रथम फंलंदाजी करत भारतीय संघाने यशस्वी जयस्वाल (88) आणि तिलक वर्मा (38) यांच्या जोरावर बांग्लादेशच्या संघासमोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचे पाठलाग करत परवेज हुसैन (47) आणि कर्णधार अकबर अली (43) यांनी उत्कृष्ट खेळी करत बांग्लादेशच्या संघाला विजय मिळवून दिला. सामना सुरू असतानाच भारतीय संघ आणि बांग्लादेशच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. परिणामी, सामना जिंकण्याच्या जल्लोषात बांग्लादेशी खेळाडू भारतीय खेळाडूंना भिडले. त्यावेळी दोन्ही संघात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, त्यावेळी मैदानात असणाऱ्या पंचानी मध्यस्ती करत हा वाद मिटवला. त्यानंतर बांग्लादेशी खेळाडूंच्या वर्तणूकीवर बांग्लादेशचे कर्णधार अकबर अली यांनी माफी मागितली. हे देखील वाचा- U19 World Cup 2020 Final: बांग्लादेशविरुद्ध ध्रुव जुरेल अनोख्या पद्धतीने झाला आऊट, आठवड्यात दुसऱ्यांदा घटली अशी चक्रावणारी घटना (Video)

ट्वीट-

दरम्यान, बांग्लादेशचा कर्णधार अकबर अली पत्रकार परिषदेत म्हणाला की, बांग्लादेशच्या संघाने पहिल्यांदा अंडर19 वर्ल्डकप जिंकला आहे. यामुळे बांग्लादेशचे गोलंदाज अधिक उत्साहित झाले होते. मैदानात जे घडले अतिशय निंदनीय आहे. तसेच अंडर19 वर्ल्डकप जिंकण्यासाठी बांग्लादेशचा संघ गेल्या 2 वर्षांपासून मेहनत करत आहे. यामुळे आज अंडर19 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले, असे मला वाटते.