भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा T20 सामना आज म्हणजेच 10 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने टीम इंडियाचा 13 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या T20 सामन्यात भारताने दमदार पुनरागमन करत यजमान संघाचा 100 धावांनी पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने शतक झळकावले, तर ऋतुराज गायकवाडने अर्धशतक झळकावले. याशिवाय गोलंदाजीत आवेश खान आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा तिसऱ्या सामन्याकडे लागल्या आहेत.  (हेही वाचा - IND vs ZIM 3rd T20I Playing 11: अभिषेक शर्मा की यशस्वी कोणाला मिळणार संधी? तिसऱ्या टी-20 मध्ये कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग 11)

वर्ल्ड कप विजेत्या संघातील तीन खेळाडूंना गेल्या तीन टी-20 सामन्यांसाठी टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे टीम इंडियात परतले आहेत. हे तीन खेळाडू साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांच्या जागी भारतीय संघात स्थान घेतील. अशा स्थितीत कोणाला खेळण्याची संधी मिळणार हे पाहणे विशेष ठरणार आहे.

पाहा पोस्ट -