IND vs ZIM 3rd T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील तिसरा टी-20 सामना 10 जुलै रोजी होणार आहे. हरारे येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात टीम इंडियाचे प्लेइंग 11 बदलणार आहे. शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल, जे टी-20 विश्वचषक 2024 च्या विजेत्या संघाचा भाग होते, ते संघात सामील झाले आहेत. या तिन्ही खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत अभिषेक शर्माला प्लेइंग 11 मधून वगळले जाऊ शकते. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी 11 खेळाडूंची निवड करणे कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासाठी कठीण जाणार आहे.
शिवम दुबेला प्लेइंग 11 मध्ये मिळू शकते संधी
अभिषेक शर्माने कारकिर्दीतील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावून स्वत:ला सिद्ध केले आहे. पण यशस्वी जैस्वाल जवळपास वर्षभरापासून टी-20 मध्ये भारतासाठी ओपनिंग करत आहे आणि त्याची कामगिरीही अप्रतिम राहिली आहे. अशा स्थितीत अभिषेकला बाहेर काढले जाऊ शकते. तर शिवम दुबेला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. संजू सॅमसन यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणार हेही निश्चित मानले जात आहे.
गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता नाही
तिसऱ्या टी-20 सामन्यात गोलंदाजीत काही बदल होण्याची शक्यता कमी आहे. या मालिकेत मुकेश कुमार आणि आवेश खान यांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांनी फिरकी विभागात चांगली गोलंदाजी केली आहे. शिवम दुबेही वेगवान गोलंदाजी करू शकतो. याशिवाय कर्णधाराकडे रियान पराग आणि यशस्वी जैस्वाल यांचाही पर्याय असेल. (हे देखील वाचा: Gautam Gambhir Team India New Head Coach: गौतम गंभीरचे टीम इंडियात पुनरागमन, मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया)
भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रायन पराग, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
मालिका 1-1 अशी बरोबरीत
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. आता या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.