विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली World Cup मध्ये हायवोल्टेज सामन्यात पाकिस्तान (Pakistan) ला 89 धावांनी धूळ चाटायला लावली. पहिले बॅटिंग करून भारताने पाकसमोर विजयासाठी 337 धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. मात्र, पाकिस्तानचे फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. फखर जमान (Fakhar Zaman) आणि बाबर आझम (Babar Azam) ला सोडून कोणताही पाकिस्तानी फलंदाज चांगली खेळी करू शकला नाही. फकर आणि बाबर या जोडीने शतकी भागिदारी केली. ही जोडी भारताच्या विजयाच डोकेदुखी ठरत असतानाच कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने 23व्या षटकात बाबरची विकेट घेत पाकला दुसरा दणका दिला. (IND vs PAK, ICC World Cup 2019: सामन्यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद झाला बोअर, जांभया देतानाचे फोटो व्हायरल)
भारताने प्रथम फलंदाजी करताना Hitman रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या वेगवान शतकी खेळीच्या जोरावर भारतानं 336 धावा केल्या. रोहित सह के एल राहुल (KL Rahul) नं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहितसोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित ने 113 चेंडूत 140 धावा केल्या. रोहित बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी आक्रमक फलंदाजी केली.
एक बाद 117 धावसंख्येवरून कुलदीप यादव आणि हार्दिकने पाकिस्तानची अवस्था 5 बाद 129 अशी केली. हार्दिकने शोएब मलिक (Shoaib Malik) ला शून्यावर बाद केले. आजच्या सामन्यात पाकिस्ताननं टॉस जिंकत पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांना महागात पडत आहे.