(Photo Credits: Getty Images)
रोहित शर्मा (Rohit Sharma) ने विश्वकप मधील आपले शतक ठोकत भारताला पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध टीम इंडिया मजबूत स्थितीत उभे केले आहे. पाकिस्तान विरुद्ध हे शतक रोहितच्या वनडे करिअरमधील 24 वं शतकआहे. या आधी विश्वकप मध्ये रोहितने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेरिके (South Africa) विरुद्ध शतक झळकावले होते आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध अर्धशतकी परी खेळली होती. (IND vs PAK, ICC World Cup 2019: 23 वर्षांनंतर रोहित शर्मा-के एल राहुलच्या जोडीने मोडीत काढला तेंडुलकर-सिद्धूचा हा विश्वकप विक्रम)
टीम इंडियासाठी सर्वाधिक वनडे शतकं झळकावण्याचा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) (49 शतकं) नावावर आहे. दुसरा नंबर लागतो, विराट कोहली (Virat Kohli) चा. 'रन मशीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटनं 41 शतकं ठोकली आहेत. या यादीत 23 शतकांसह रोहित तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. त्याखालोखाल सौरव गांगुली (Sourav Ganguly) (22 शतकं), शिखर धवन (Shikhar Dhawan) (16 शतकं) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) (15 शतकं) हे तिघं आहेत.
दरम्यान, रोहितने के-एल राहुलच्या साथीने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध  विश्वचषक सामन्यात भारतासाठी सर्वोच्च ओपनिंग भागीदारीचा विक्रम नोंदवला आहे.