IND vs NZ, ICC World Cup 2019: नॉटिंगहॅममध्ये पाऊस थांबला पण टॉसला विलंब
Image Source/PTI

इंग्लंड (England) च्या नॉटिंगहॅम (Nottingham मध्ये सतत पडणाऱ्या पावसाने थोडी विश्रांती घेतलेली दिसतेय. मात्र नाणेफेक उशीरानं होण्याची शक्यता आहे त्यामुळं भारतीय चाहते सध्या देवाकडे साकडे घालत आहेत. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील सामना होत असला तरी पावसामुळं कोण नाणेफेक जिंकतो, याकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. (IND vs NZ, ICC World Cup 2019 Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने याआधी दक्षिण आफ्रिका (South Afric) आणि ऑस्ट्रेलियाला (Australia) पराभूत केल्यानंतर आता विराटसेना विजयी हॅट्रीक साधण्यासाठी उत्सुक आहे.

पावासामुळे सामना उशीर सुरु होण्याच्या मार्गावर असला तरी, सर्वांचे लक्ष कोहलीवर असणार आहे. कारण आज विराट खेळला तर, तो सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा रेकॉर्ड तोडू शकतो. वनडे क्रिकेटमध्ये विराटला 11 हजार धावा करण्यासाठी आता केवळ 57 धावांची गरज आहे. विराटने जर, आज 11 हजार धावांचा पल्ला गाठला तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद धावा करणारा फलंदाज ठरले.