IND vs NZ 1st T20I: विराट कोहली याचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 साठी असा आहे भारताचा प्लेयिंग इलेव्हन
विराट कोहली, केन विल्यमसन

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील पहिला टी-20 सामना ऑकलंडच्या इडन पार्कवर थोड्याच वेळात सुरु होईल. नवीन वर्षातील भारताचा हा पहिला विदेश दौरा आहे. 5 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट मालिकेची सुरुवात आजटी-20 सामान्यापासून होणार आहे. आजच्या सामन्यात टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडने मजबूत प्लेयिंग इलेव्हन निवडला आहे. शिवाय, भारतही पूर्ण तयारीने मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल डावाची सुरुवात करतील, तर विराट त्याच्या नियमित तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येईल. राहुलला विकेटकिपिंगची जबाबदारी देण्यात आली असल्याने रिषभ पंतला (Rishabh Pant) वगळले आहे, तर मनीष पांडेला (Manish Pandey) पाचव्या स्थानावर स्थान मिळाले आहे. रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेची अष्टपैलू म्हणून निवड झाली आहे. गोलंदाजीच्या विभागातही फारसे बदल झाले नाही. (IND vs NZ T20I 2020: भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेत बनू शकतात 'हे' 5 प्रमुख रेकॉर्डस्)

दुसरीकडे, गेल्या वर्षी न्यूझीलंडने टी-20 मालिकेत भारताला 2-1 असे हरवले होते. मात्र, यंदा त्यांच्यासाठी हे कार्य यंदा मुश्किल असणार आहे. भारतविरुद्ध कॉलिन मुनरो आणि मार्टिन गप्टिल किवी डावाची सुरुवात करतील, कर्णधार विल्यमसन, टिम सेफर्ट, आणि रॉस टेलर मध्यम क्रम सांभाळतील. भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये आजवर 5 टी -20 सामने खेळले आहेत, परंतु विजय फक्त एकामध्ये जिंकला गेला. 2019 मध्ये भारताने ऑकलंडमध्ये यजमानांना 7 विकेटने पराभूत केले आणि किवी देशात एकमेव विजय नोंदवला.

पहिल्या टी-20 साठी असा आहे भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, टिम सेफर्ट (विकेटकीपर), रॉस टेलर, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिशेल सेंटनर, हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी आणि ब्लेअर टिकनर.