टीम इंडियाचा (India) न्यूझीलंड (New Zealand) दौरा येत्या 24 जानेवारी रोजी 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसह सुरु होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वनडे मालिकेत केलेल्या प्रदर्शनानंतर भारतीय संघाचे आत्मविश्वास वाढला असेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत 3-0 ने झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंड भारतविरुद्ध प्रभावी खेळी करण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेपूर्वी, शिखर धवन याला दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे, तर रणजी करंडक सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या इशांत शर्मा यालाही कसोटी मालिकेला मुकावे लागल्याची शक्यता आहे. न्यूझीलंडच्याही बहुतेक खेळाडूंना दुखापत झाली आहे. यात मॅट हेन्री, टॉम लॅथम, डग ब्रेसवेल, अॅडम मिलने यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, अनेक खेळाडूंच्या अनुपस्थितीनंतरही न्यूझीलंड घरच्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतीय संघासाठी धोका निर्माण करू शकतात. म्हणूनच या दोन्ही संघांदरम्यान पुन्हा एकदा जोरदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (IND vs NZ 1st T20I: केएल राहुल कि रिषभ पंत? न्यूझीलंडविरुद्ध टी-20 'हा' करणार विकेटकिपिंग, विराट कोहली ने केली पुष्टी)
या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंना अनेक मनोरंजक विक्रम नोंदवण्याची संधी असेल. आता, टी-20 च्या आगामी मालिकेदरम्यान कोण-कोणते खेळाडू महत्वाचे 5 टप्पे पार करू शकतात ते पाहूया:
1. टी-20 मध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड्स
विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटयामध्ये सर्वाधिक 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्डच्या यादीत 12 पुरस्कारांसह अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर बसला आहे. कोहलीच्या धावांची भूक सर्वांनाच ठाऊक असल्याने न्यूझीलंडविरुद्ध तो चांगली कामगिरी करेल आणि अव्वल स्थान मिळवले अशी अपेक्षा आहे.
2. रॉस टेलर 100 टी-20 खेळणारा पहिला किवी खेळाडू
रॉस टेलर हा किवी संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. 2006 मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामन्यात पदार्पण केल्यानंतर टेलरने आजवर 95 टी-20 सामने खेळले आहेत. दुर्देवाने कोणतीही दुखापत झाली नसल्यास, मालिका संपल्यानंतर टेलर 100 आंतरराष्ट्रीय टी-20 खेळणारा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू बनेल. याप्रक्रियेत, शोएब मलिक आणि रोहित शर्मा नंतर 100 सामने खेळणारा टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील तो तिसरा खेळाडू बनेल.
3. सलामी फलंदाज म्हणून रोहित शर्माच्या 10,000 आंतरराष्ट्रीय धावा
सलामी फलंदाज म्हणून रोहितने आजवर 216 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 9937 धावा केल्या आहेत. आगामी टी-20 मालिकेमध्ये तो 10,000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी रोहितला 63 धावांची गरज आहे, त्यामुळे तो ही कामगिरी कदाचित पहिल्या सामन्यातच करेल अशी चिन्ह दिसत आहे. शिवाय सचिन तेंडुलकरच्या 214 डावानंतर रोहित दुसरा वेगवान भारतीय खेळाडूही ठरेल.
4. मार्टिन गप्टिलच्या 2500 टी-20 धावा
न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने या सामन्यात 64 धावा करताच आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा नंतर तो तिसरा फलंदाज होईल.
5. न्यूझीलंडमध्ये भारताचा पहिला मालिका विजय
वर्षानुवर्षे, दोन्ही संघांनी चार द्विपक्षीय मालिकांमध्ये भाग घेतला आहे आणि प्रत्येक संघ दोन गट केले आहेत. यापैकी भारताने केवळ 2017 मधील घरगुती मालिका जिंकली असून उर्वरित मालिका गमावल्या आहेत. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका वगळता भारताने नुकत्याच झालेल्या पाच टी-20 मालिकेपैकी चार मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे, आपली घुडदौड कायम राखण्यासाठी भारत आगामी मालिकेत किवी संघाला जोरदार स्पर्धा देतील आणि मालिका जिंकण्यासह न्यूझीलंडमध्ये पहिली टी-20 मालिकादेखील जिंकू शकतील.
शुक्रवारी 24 जानेवारी रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी -20 सामना खेळला जाईल. हा सामना ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये खेळला जाईल. ईडन पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या दोन्ही संघांमधील एकमेव टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला होता.