IND vs AUS : T-20 क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंची नावे जाहीर
भारतीय संघ (Photo: IANS)

IND vs AUS T-20 : ऑस्ट्रेलियविरुद्धच्या टी-20 क्रिकेटच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंची नावे बीसीसीआय कडून आज जाहीर करण्यात आली आहे. तर बुधवारी गॅबा येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय क्रिकेट संघाचा सामना पार पडणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना लढण्यासाठी सज्ज झाला आहे. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या सामन्यामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची यादी जाहिर केली आहे. तर यष्टिरक्षकासाठी रिषभ पंतला संधी दिली आहे. तसेच फलंदाजीत कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना घेतले आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि खलील अहमद हे जलद मारा सांभाळणार आहेत.

तसेच गोलंदाजीमध्ये कृणाल पांड्या, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या तिघांना संधी दिली आहे. तर या तिघांमधील एका गोलंदाजाला उद्याच्या सामन्यामध्ये खेळावे लागणार आहे.