Tokyo Paralympics 2020: बॅडमिंटनमध्ये सुहास एल. यतीराज यांचा अंतिम फेरीत प्रवेश, इंडोनेशियन खेळाडू सेटियावान फ्रेडीला केले पराभूत
Suhas Yathiraj (Pic Credit - ANI)

जपानची (Japan) राजधानी टोकियो येथे आयोजित पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय खेळाडू चमकदार खेळ करत आहे. भारताने आतापर्यंत येथे 15 पदक मिळवले आहे. शनिवारी प्रमोद भगत (Pramod Bhagat) आणि सुहास एल. यतीराज यांनी (Suhas L. Yatiraj) आपापले बॅडमिंटन (Badminto) उपांत्य फेरीचे सामने जिंकून अंतिम फेरीत (Final) प्रवेश केला आहे. तसेच भारताला आणखी दोन पदके मिळवून दिली. आता हे दोन्ही खेळाडू सुवर्णपदक (Gold Medal) जिंकण्यासाठी अंतिम सामना खेळतील.  शनिवारी भारतीय बॅडमिंटनपटू सुहासने पुरुष एकेरी एसएल 4 गटातील सामन्यात 2-0 ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. इंडोनेशियन खेळाडू सेटियावान फ्रेडीविरुद्ध सरळ गेममध्ये विजय मिळवून सुवर्णपदकाकडे वाटचाल केली. 21-9 च्या गुणांसह सुहासने पहिला गेम सहज जिंकला.

यानंतर, दुसऱ्या गेममध्ये इंडोनेशियाच्या खेळाडूने काही स्पर्धा दिली पण सामना 21-15 ने गमावला. भारतीय खेळाडूंनी पॅरालिम्पिकमध्ये त्यांची सर्वोत्तम कामगिरी दिली आहे. 1968 मध्ये पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारताने सध्याच्या स्पर्धेपर्यंत एकूण 12 पदके जिंकली होती आणि त्यानंतर त्याने एकाच स्पर्धेत 13 पदके जिंकून ऐतिहासिक यश मिळवले आहे. हेही वाचा Tokyo Paralympics 2020: भारतीय बॅडमिंटनपटू Pramod Bhagat ने गाठली अंतिम फेरी, Silver Medal झाले निश्चित

सुहास एल यतीराज यांनी काल गटात सलग दुसरा विजय नोंदवला. ग्रुप ए मध्ये सुहासने इंडोनेशियाच्या सुसानतो हॅरीचा अवघ्या 19 मिनिटांत 21-6, 21-12 असा पराभव केला. 38 वर्षीय सुहासने गुरुवारी पहिल्या सामन्यात जर्मनीच्या येन निकलास पॉटला केवळ 19 मिनिटांत 21-9 21-3 ने पराभूत केले होते. सुहासला एका घोट्याची समस्या आहे. कोविड -19 विरुद्धच्या लढाईत त्यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहास एलवायच्या नेत्रदीपक कामगिरीनंतर भारतात आनंदाचे वातावरण आहे. विशेषत: त्याच्या जिल्ह्यात गौतम बुध नगरमध्ये उत्साह साजरा करत आहे. यतीराजच्या या विजयामुळे नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या लोकांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली आहे. लोक म्हणतात की सुहास नक्कीच सुवर्णपदक आणतील. यापूर्वीही DM सुहास यांच्या नावावर अनेक पदके जिंकली आहेत.

सुहास यतीराज अंतिम फेरीत पोहोचल्याने भारतासाठी आणखी एक रौप्य पदक निश्चित झाले आहे. आता तो पदकाचा हा चांदीचा रंग सुवर्णात रंगवू शकतो की नाही, हे रविवारी कळेल. याआधी भारताच्या प्रमोद भगतनेही बॅडमिंटनच्या एसएल 3 प्रकारातील अंतिम तिकीट कापून भारतासाठी रौप्य पदकाची खात्री केली होती. प्रमोद भगतने उपांत्य फेरीत जपानच्या शटलरचा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. त्याने जपानी शटलर फुजीहाराचा 21-11, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला.