रविंद्र जडेजा (फोटो सौजन्य- ट्विटर)

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला पराभूत केल्यावर भारतीय संघ आज न्यूझीलंडच्या (New Zealand) संघाशी दोन हात करणार आहे. पण इंग्लंड (England) मध्ये सतत पडणारा पाऊस खेळात विघ्न घालतोय. दरम्यान, एकीकडे पावसामुळं चिंतेत असलेला भारतीय संघ सध्या ड्रेसिंगमध्ये आराम करातान दिसत आहे. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (IND vs NZ, ICC World Cup 2019: सामन्याआधीच हरभजन सिंह ने केली भारत विरुद्ध न्यूझीलंड मधील विजेत्या संघाची घोषणा)

BCCI ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारताचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चाहत्यांना भारतीय संघाची ड्रेसिंग रुम तर दाखवतोयच त्याचबरोबर संघातील खेळाडूंची पोलखोलही करतोय. व्हिडिओमध्ये हार्दिक, विराट , रोहित, जडेजा सारखे खेळाडू कुठे बसतात, कोणाकाला ड्रेसिंग रूममध्ये सर्वात जास्त जागा मिळाली आहे हे हि तो सांगतोय.

सर जडेजा नेहमी असतो कर्णधार कोहलीच्या बाजूला

पंड्या म्हणतो, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नेहमी विराट कोहली (Virat Kohli) च्या च बाजूची जागा पकडतो. शिवाय, सुंपर्ण संघात जेवढी जागा कोणाकडे नाही तेवढी जागा ड्रेसिंग रुममध्ये कर्णधार कोहलीकडे आहे, हे ही हार्दिकने सांगितले.

न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी एक गोष्ट लक्षात घेणे जरूरी आहे कि, World Cup आधी च्या सराव सामन्यात न्यूझीलंड चा संघ भारतावर भारी पडला होता. भारताचा संपुर्ण संघ 179 धावांवर बाद झाला होता. हा सामना भारताला गमवावा लागला होता.