India Vs New Zealand ODI Series (Photo Credits: Twitter)

भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) मधील विश्वकप सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. परंतु भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरहजन सिंघ (Harbhajan Singh) ने आधीच विजेत्यांची घोषणा केली आहे. हरभजनने ट्विटकरून विजेत्यांचे नाव सांगितले. हरभजन लिहितो, 'असे दिसते की आज पावसाचा विजेता होणार आहे, भारत किंवा न्यूझीलंड नव्हे.. नॉटिंघममध्ये पाऊस पडत आहे ..' (IND vs NZ ICC Cricket World Cup 2019 Weather Report: जाणून घ्या आजच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान हवामानाचा अंदाज आणि आणि पिचची स्थिती)

भारत आणि न्यूझीलंड हे यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेले दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. न्यूझीलंड संघ तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारत दोन सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पण, क्रिकेट चाहत्यांच्या या उत्सुकतेवर आज पाणी फिरण्याची शक्यता आहे कारण स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या माहितीप्रमाणे पावसाच्या सतत धारेमुळे टॉस उशिरा होणार आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत मागील चार दिवसांत पावसामुळे तीन सामने रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ओढावली. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक सामने रद्द होण्याचा विक्रम यंदा नोंदवला गेला आहे.